Shivsena (UBT) News : ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा शिवशाही सरकार आणण्याचा निर्धार..

Maharashtra : १८ ते २३ जूलै दरम्यान शाखानिहाय ही मोहिम राबवली जाणार. या निमित्ताने संघटनात्मक आढावा देखील घेणार.
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Shivsena - Uddhav Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Marathwada : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने राज्यात पुन्हा शिवशाहीचे सरकार आणण्याचा निर्धार करत मोहिम राबवण्यात येणार आहे. (Shivsena (UBT) News) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली ` चला निर्धार करूया, आणूया शिवशाहीची सरकार` या मोहिमेला उद्यापासून जिल्ह्यात सुरूवात होणार आहे.

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Monsoon Session News : विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने दानवे भाव खाऊन गेले..

वर्षभरापुर्वी शिवसेनेत बंड झाले आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. (Shivsena) वर्षभरात राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार समर्थक आमदारांसह या सरकारमध्ये सहभागी झाले.

पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतरही शिवसेनेचा न्यायालयीन लढा सुरूच आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी ठाकरे गट कामाला लागला आहे. (Marathwada) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. उद्या (ता.१८) पासून `चला निर्धार करूया, आणूया शिवशाहीचे सरकार` या मोहिमेला सकाळी १० वाजता गंगापूर तालुक्यातील वाळुज येथून प्रारंभ होईल.

१८ ते २३ जूलै दरम्यान जिल्ह्यातील शाखानिहाय ही मोहिम राबवली जाणार असून या निमित्ताने संघटनात्मक आढावा देखील घेण्यात येणार आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, मराठवाडा सचिव अ‍ॅड. अशोक पटवर्धन यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला संघटक, पदाधिकारी व शिवसैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com