Chhagan Bhujbal TCS Controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal TCS Controversy : 'TCS' कंपनीची पाठराखण! प्रकरण चिघळवणाऱ्यांना मंत्री भुजबळांनी फटकारलं; किती ताणायचं?

While commenting on the Nashik religious conversion issue during his Ahilyanagar tour, Minister Chhagan Bhujbal extended support to TCS : अहिल्यानगर दौऱ्यात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील धर्मांतर, राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण, राज्यातील राॅकेल पुरवठ्यावर माध्यमांशी संवाद साधला.

Pradeep Pendhare

Nashik conversion case : नाशिकमधील 'TCS' या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये मुस्लिम धर्माच्या संशयितांकडून हिंदू महिला कर्मचाऱ्यांना शोषण, धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा 'SIT' मार्फत तपास सुरू आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी, कोणालाच सोडणार नाही, असा गर्भित इशारा दिला आहे. त्याचवेळी अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी, याप्रकरणी वेगळीच भूमिका घेतली आहे. ''TCS' कंपनीची पाठराखण करत, झालेल्या प्रकारावर कारवाई होणारच आहे. पण किती ताणायचं, त्यांना फार बाहेरच काढून टाकायचं, असा कोणाचा विचार असेल, तर तो चूक आहे,' असे मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे अहिल्यानगर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील 'TCS' कंपनीतील धर्मांतर प्रकरणावर भाष्य करताना, राज्यातील राॅकेल पुरवठा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य केलं.

नाशिकमधील (Nashik) 'TCS' कंपनीतील धर्मांतराच्या मुद्यावर बोलताना म्हटले, "'TCS' कंपनी विरोधात आत्तापर्यंत जे समोर आलेलं आहे, त्यावर कारवाई सुरू आहे, याचा अर्थ असा होत नाही की 'TCS' कंपनीला पूर्ण बदनाम करणं. राज्यात असलेल्या कंपन्यांमधील ही अतिशय महत्त्वाची कंपनी आहे. लोकांचा तिच्यावर विश्वास आहे."

'TCS' कंपनीची पाठराखण

'किती ताणायचं? त्यांना फार बाहेरच काढून टाकायचं, असा कोणाचा विचार असेल, तर तो चूक आहे. कारवाई झाली नाही आणि लोकांनी आवाज उठवला, तर समजण्यासारखा आहे. पोलिस पूर्णपणे कारवाई करत आहे. तसेच कंपनीचे जे प्रमुख आहे, त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच आपल्याला या प्रकाराची कल्पना नव्हती, असाही खुलासा केला आहे. अशा कंपन्या जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर जाणार नाही, यासाठी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल,' असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले.

विलिनीकरणावर दोन्ही बाजूने चर्चा थांबली

'दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण संदर्भात कोणतीही चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही, दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलेल्या आहे की, हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. पूर्वी देखील जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की, या विषयावर आता चर्चा करणार नाही. आमच्या बाजूने देखील सांगण्यात आलेला आहे की, विलीनीकरणावर चर्चा करणार नाही म्हणून, असे स्पष्ट करत,' मंत्री भुजबळ यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

सुनेत्रावहिनींना पाठिंबा, ही चांगली गोष्ट

'अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, या आमदार रोहित पवार यांच्या काकी लागतात. त्यांच्या पक्षाने बारामती पोटनिवडणुकीत, त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. मग त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे. रोहित पवार यांच्या पक्षाने तिथं उमेदवार दिलेला नाही आणि पाठिंबा देखील दिलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे,' असे सांगून शरद पवार राष्ट्रवादीच्या भूमिकेचं मंत्री भुजबळ यांनी स्वागत केलं.

जुने परवान्यांचे नूतनीकरण झाले म्हणून समजा

महाराष्ट्रमध्ये रॉकेल वितरणासाठी मोठे शंभर डिलर पुढे आलेले आहेत. काही प्रमाणात कामाला सुरवात झालेली आहे. पण काही ठिकाणी अडथळे देखील आहेत. ज्यांची जुनी परवाने आहेत ते पुन्हा नूतनीकरण झाले आहेत, असे समजा, आणि वितरण सेवेला सुरवात करा. रॉकेलचा कोटा भरपूर आहे. अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होणार आहे, तिकडे काही सांगता येत नाही. एकदमच बंद पडतं की, काय? पण आता तरी सुरळी सुरू आहे. पण परिस्थितीनुसार तयारी ठेवली आहे, असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

राॅकेल पुरवठ्यावर मोठा निर्णय

महाराष्ट्रमध्ये रॉकेल बंद झाले होते. यापुढे आता ही वितरण सेवा बंद करणार नाही. आता आमच्याकडे साडेतीन हजार किलो पेक्षा जास्त राॅकेलचा कोटा आहे. आत्ताची परिस्थिती सुरळीत राहिली, तरी भविष्यात हा रॉकेल वितरणाचा सेवा सुरूच ठेवणार, असे निर्णय झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT