Nilesh Lanke vs Sujay Vikhe : खरात प्रकरणात लंकेंचा विखेंवर थेट वार! ‘तो’ फोटो दाखवत उघड केला संबंधांचा धागा

Nilesh Lanke hits back at Sujay Vikhe during Rahuri by-election campaign over Nashik Ashok Kharat case and other controversies in Ahilyanagar : अशोक खरातसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध वादग्रस्त प्रकरणावरून डिवचणाऱ्या सुजय विखे पाटलांना खासदार नीलेश लंकेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Nilesh Lanke 1
Nilesh Lanke 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाचा राजकीय विस्तार मोठा आहे. कुठे ना कुठे त्याचा संबंध समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचाही फोटो खरातबरोबर व्हायरल झाला होता. तसाच फोटो भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा व्हायरल झाला होता.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून, अशोक खरात याच्यासह विविध घोटाळ्यावरून खासदार लंकेंना नाव न घेता डिवचत होते. याला आता खासदार लंकेंनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे, विखे कुटुंबांतील नातेवाइकांचा फोटो समोर आणत खासदार लंकेंनी थेट सुनावलं आहे.

खासदार नीलेश लंके म्हणाले, "कोणतीही सभा असो, निवडणूक असो, धार्मिक कार्यक्रम असो, कार्यक्रमाची सभा असो, आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचे काही होत नाही. काल परवा त्यांच्या नेत्यांनी, अशी टीका केली की, या जिल्ह्यातील एक नेता असा ही की, तो प्रत्येक ठिकाणी असतो. तसं खरात (Ashok Kharat) प्रकरणांमध्ये नाव घेतलं. पण त्यांना एकच सांगतो, आपल्या घरामध्ये लोक खरातची देवपूजा करण्यापर्यंत होते. ते अगोदर शोधा, ते कुठे होते, मग दुसऱ्यावर टीका करा."

'खरात प्रकरणाशी, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक संपर्क अन् संबंध कोणाचा होता, तर तो विखे कुटुंबाचा होता. विखे कुटुंबातील काका कोयटे असो किंवा त्यांचे घरातील इतर सदस्य असो, यांचा संपर्क होता. आता हेच ते विसरले आहेत. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे, अगोदर घरातले कोणते लोकं खरातबरोबर होते, ते फोटो चेक करा आणि मग माझ्यावर टीका करा,' असा घणाघात खासदार लंके (Nilesh Lanke) यांनी केला.

Nilesh Lanke 1
Sujay Vikhe claim : विखे विरोधक अशोक खरातचं मार्गदर्शन घ्यायचे! 'शनी शांत करणारा नेता मीच', सुजय विखेंचा अनोखा दावा

मविआ शेतकऱ्यांसाठीच लढते

राहुरी निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक, असो त्यामध्ये प्रचाराचे मुख्य मुद्दे हे शेती, शेतकरी, शेतकरी उत्पादक मालाच्या बाजार भावाबाबत असले पाहिजेत. आम्ही आत्ताची निवडणूक देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन सामोरे जात आहोत. दिल्ली संसदेत जेव्हा आम्हाला संधी मिळते, त्यावेळेस आम्ही मविआकडून शेतकऱ्यांच्या उत्पादक बाजार भावाबाबत मुद्दे लावून धरत असतो. त्यासाठी आंदोलन करत असतो. कांदा भावावर, दूध दरवाढी प्रश्नावर आणि निर्यातीच्या प्रश्नावर, आम्ही वेळोवेळी दिल्ली संसदेत आंदोलन केली आहेत, याकडे खासदार लंकेंनी लक्ष वेधलं.

Nilesh Lanke 1
Nilesh Lanke Controversy : 'तुम्ही कुठलेही कॉन्ट्रोव्हर्सी काढा, तो व्यक्ती दिसणारच'; विखे पाटलांनी केरळम् वरून येताच नीलेश लंकेंना डिवचलं

तनपुरेंच्या निर्णयाला छेडछाड नको

शेतकऱ्यांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे, सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे ,निवडणुकीमध्ये तर्क-वितर्क काढले जातात. राजकारणामध्ये चर्चा होत असल्याने ती झालीच पाहिजे, असे सांगताना, प्राजक्त तनपुरे यांनी वैयक्तिक कारणातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्याला छेडछाड करणे आपल्याला संयुक्तिक वाटत नाही. पण प्रत्येक क्षणाला निवडणुकीचा चित्र बदलत आहे, हे मात्र नक्कीच. जे काय होईल ते सकारात्मक होईल आणि हा विधानसभा मतदारसंघात शाॅकेबल न्यूज मिळेल, असा दावा खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.

भाजपचे 40 जण सर्वसामान्य उमेदवाराविरोधात

मतदारसंघात चाळीस-चाळीस मंत्री येतात. सीएम देखील प्रचारासाठी येत आहेत, हेच आमच्या उमेदवाराच्या विजयाचे प्रतीक आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराविरोधात संपूर्ण भाजप मैदानात आहेत, याचा अर्थ इथं जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, असा दावा खासदार नीलेश लंके यांनी केला.

नेमका कोणता फोटो आहे 'तो'

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे, सुजय विखे पाटील यांचे मामा आणि शालिनीताई विखे पाटील, यांचे बंधू महानंदाचे माजी अध्यक्ष, गोदावरी दूध संघाचे चेअरमन, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे अशोक खरात आणि नामकर्ण आवारे यांच्यामध्ये बसलेले हा फोटो आहे. जर विखे पाटील यांना ठाऊक होते हा किती भोंदू आहे तर मग त्यांचे मेहुणे एवढे निकटवर्तीय का? असा प्रश्न खासदार लंकेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com