Chhagan Bhujbal direct conflict with BJP in Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: ...तर छगन भुजबळ-भाजपमध्ये थेट संघर्ष; महायुतीचे भिजत घोंगडे कायम; 'नगराध्यक्ष'पदावरून येवल्यात ट्विस्ट!

Yeola BJP News: नाशिक जिल्ह्यात येवला नगरपालिका निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. मंत्री छगन भुजबळ भक्कम तयारीने या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे ते स्वबळावर लढणार की भाजपला सोबत घेणार याची उत्सुकता आहे.

Sampat Devgire

NCP vs BJP power struggle in Yeola : येवला नगरपालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याबाबत चर्चा झाली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी यासंदर्भात आमदार डॉ राहुल आहेर यांच्याशी चर्चा केली. युती दोघांना हवी मात्र उमेदवारीचा अडथळा आडवा येण्याची शक्यता आहे.

येवला नगरपालिकेत भाजपचा लोकनियुक्त नगराध्यक्ष होता. त्यामुळे मंत्री भुजबळ यांच्याशी युती झाली तरी या पदावर भाजपलाच उमेदवारी हवी आहे. भुजबळ यांनी मात्र या आधीच मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केल्याचे कळते.

आज पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र महायुतीचे भिजत घोंगडे कायम आहे. महायुतीच्या प्राथमिक चर्चेत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष असे धोरण ठरले आहे.

त्यामुळे येवल्याच्या नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थात भुजबळ यांनी दावा केला आहे. भुजबळ यांचा शहरावर असलेला प्रभाव कायम ठेवण्यासाठी नगराध्यक्ष पदावर ते ठाम असल्याचे बोलले जाते.

येवल्यात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची बैठक निवडणूक निरीक्षक आमदार डॉ राहुल आहेर, जिल्हाप्रमुख यतीन कदम, माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार आदींच्या उपस्थितीत झाली. यावेळी पक्षाने स्वबळावर की महायुती याचा निर्णय घ्यावा. मात्र कोणत्याही स्थितीत आयात उमेदवाराला उमेदवारी देऊ नये असे ठाम मत इच्छुकांनी व्यक्त केले.

येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर मुळे भुजबळ यांचे मताधिक्य सव्वीस हजार एवढे खाली आले. त्यामुळे त्यांच्या विजयात भाजपचा मोठा वाटा असल्याचा दावा बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला.

भाजप नगराध्यक्षपदासाठी ठाम...

येवला नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि मंत्री भुजबळ यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे महायुती फिस्कटल्यात जमा आहे. अशा स्थितीत मंत्री भुजबळ आणि शिवसेना या दोघांना भाजपची मदत हवी आहे. त्यामुळे भाव वधारलेला भाजप नगराध्यक्षपदावर ठाम राहून सगळ्यांची अडचण करण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT