Nitesh Rane : महायुतीत पुन्हा ठिणगी! नितेश राणेंचं उदय सामंतांना थेट आव्हान; म्हणाले, “खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत...”

Nitesh Rane Vs Uday Samant : तळकोकणात सुरू झालेल्या महायुतीतील वाद आता शेजरी असणाऱ्या जिल्ह्यात पोहचला आहे. येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपला दिलेल्या आव्हानाला आता मंत्री नितेश राणे यांनी आव्हान दिले आहे.
local body elections Nitesh Rane And Uday Samant
local body elections Nitesh Rane And Uday Samantsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतभेद तीव्र झाले आहेत.

  2. उदय सामंत यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  3. या वादामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Ratnagiri News : महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद अद्याप काही केल्या थांबलेला नाही. पालकमंत्री उदय सामंत आणि संपर्क मंत्री नितेश राणे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. सामंत यांनी खुमखुमी काढत भाजप मंत्री नितेश राणेंसह राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांच्यावर टीका केली होती. त्याला आता खुद्द नितेश राणेंनी पलटवार केला असून त्यांनीही उदय सामंत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. तसेच 'कोणाला खुमखुमी मिटवायची असेल... तर आम्ही तयार आहोत' असे आव्हाण दिले आहे. या वार- पलटवारामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन्ही मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जोरदार वाक युद्ध पहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने एकला चलोचा नारा दिला आहे. तर यावरूच रत्नागिरीत राजकीय वातावरण तापले आहे. येथेही संपर्क मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि प्रशांत यादव यांनी स्वबळाचा नारा दिला होता. ज्यावरून उदय सामंत यांनी नितेश राणे यांच्यासह इतरांचे नाव न घेता जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यासाठी शिवसेना तयार असल्याचे म्हटले होते.

यानंतर जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता. तो अद्याप थांबलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरुन सुरू झालेला वाद आता नितेश राणे विरुद्ध उदय सामंत असा रंगला आहे. तर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. नितेश राणे यांनी, कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत, असे म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

local body elections Nitesh Rane And Uday Samant
Nitesh Rane: नितेश राणेंचा करेक्ट कार्यक्रम? मुस्लिमांबाबतच 'ते' वक्तव्य भोवलं; सरकार पाठवणार कारणे दाखवा नोटीस

नितेश राणे यांनी, भाजप कार्यकत्याला सन्मान मिळावा, कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळावी हे पाहणे भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. तर तो मिळावा म्हणूनच आम्ही बोलतो. पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच त्यांनी भाजप म्हणून आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका असाही इशारा दिला असून भारतीय जनता पक्षाची ताकद 2019 नंतर आतापर्यंत वाढली आहे.

गावागावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळं निर्माण झालं असून आमचे कार्यकर्ते, आमचं मतदान हीच आमची ताकद आहेत. जी आता वाढली आहे. यामुळे रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक सन्मानजनक वागणूक मिळावी. येथे युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती झालीच नाही तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम असल्याचे म्हणत नितेश राणेंनी उदय सामंत यांना थेट आव्हानच दिले आहे.

तर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले असून कार्यकर्त्यांना आता अपेक्षा आहेत. कोणी आम्हाला कमी लेखू नयेत अथवा कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये. तर कोणी आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये. कोणाला खुमखुमी काढायची असेल, मिटवायची असेल तर आम्ही देखील तयार आहोत, असेही नितेश राणे यांनी नाव न घेता उदय सामंत यांना सुनावले आहे.

local body elections Nitesh Rane And Uday Samant
Nitesh Rane : 'आमची राखरांगोळी झाली, पण नितेश राणे फिरकले नाहीत' : कुंभमेळ्यात मुस्लिमांना विरोध करताच हिंदू शेतकरी भडकले

FAQs :

1. नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात वाद का झाला?
स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये युती करायची की नाही यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले.

2. उदय सामंत यांनी काय वक्तव्य केलं होतं?
त्यांनी म्हटलं होतं की, “ज्यांना स्वबळाची खुमखुमी असेल त्यांनी आपला धनुष्यबाण चालवावा.”

3. नितेश राणे यांनी कसं उत्तर दिलं?
राणे म्हणाले, “कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.

4. या वादाचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीतील एकजुटीवर परिणाम होऊन निवडणूक रणनितीवर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

5. हा वाद कुठल्या पार्श्वभूमीवर घडला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या जागा वाटप आणि युती निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com