Loksabha Election : नाशिक मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र, छगन भुजबळ हेच येथून उमेदवार असावेत, असा आग्रह भाजपमधूनच केला जात होता. तशा सूचनादेखील दिल्लीतून करण्यात आल्या होत्या. मात्र, शिंदे गटाने नाशिकवरील आपला दावा सोडला नव्हता. त्यामुळे या जागेवरून उमेदवार कोण याचा तिढा कायम होता. शेवटी आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, दिल्लीच्या बैठकीत नाशिकच्या जागेवर चर्चा झाली होती. अजित पवार यांच्याकडून समीर भुजबळ यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र अमित शाह यांनीच छगन भुजबळ यांचे नाव घेतले होते. अजित पवारांशी बोलून झाल्यावर मी नाशिकमध्ये जाऊन आढावा घेतला. मला सर्वच जाती धर्मातून चांगला प्रतिसाद होता. आता जागा आणि उमेदवार जाहीर करण्याबाबत उशीर होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जागेवर तिढा निर्माण होत असल्याने माघार घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीचा उमेदवार हा प्रचारात पुढे गेला आहे. मात्र, महायुतीचा उमेदवार घोषित नसल्याने ही जागा अडचणीत येऊ शकते. जेवढा उशीर होईल तेवढं नुकसान होईल.जागेचा तिढा सुटला पाहिजे आणि लवकर निर्णय होऊन कामाला सुरुवात झाली पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.
माझ्यावर मोदी (Narendra Modi) , शाह यांनी विश्वास दाखवला मी त्यांचे आभार मानतो. माझ्या नावाच्या चर्चेनंतर मी शहानिशा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा केली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीसाहेबांचा निरोप आहे तुम्हाला लढावे लागणार आहे. त्यामुळे चर्चेनुसार जागा जाहीर व्हायला हवी होती. आता ३ आठवडे पूर्ण झालेत. मात्र, मी आता माघार घेत आहे. या ठिकाणी तातडीने निर्णय व्हायला हवा. उगीच अडचण निर्माण व्हायला नको, असेदेखील भुजबळ यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.