Chhagan Bhujbal & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal news : शिंदे गटाच्या आमदारांवर लक्ष का नाही ठेवले?.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal on Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीविषयी लिहिलेल्या अग्रलेखावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चागंलेच संतापले आहेत. राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटाच्या आमदारांच्या बॅगांवर ठेवले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला त्यांनी शिवसेनेचे खासदार राऊत यांना लगावला. (If Sanjay Raut keep watch on Shinde group`s MLA then todays situation would not be there)

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी (NCP) अग्रलेख लिहिला होता. त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटले. याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhubal) यांनी राऊत यांच्यावर टिका केली आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, ‘आघाडीत बिघाडी नको’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उगाचच काही ना काही उकरून काढतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे व जयंत पाटील हे नेते नेतृत्व करणारे आहेत ते कुठे गेले, कोणाच्या घरी गेले, त्यांना माहीत. परंतु

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयात दोनदा जाण्याच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. त्यावर खासदार राऊत यांनी सामनाच्या लेखा मधून टीका केली. खासदार शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते आहेत. परंतु पक्ष पुढे नेता येईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. अशी टीका करण्यात आली आहे.

त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे सांगितले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आहेत व त्यांच्यात प्रचंड क्षमता आहे. या नेत्यांवरची जबाबदारी टाकली जाईल. ती समर्थपणे पेरण्याची धमक आहे.

खासदार राऊत यांचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते नेतृत्व करणारे आहेत. ते कोणाच्या घरी गेले हे त्यांना माहीत. परंतु राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटाच्या आमदार व त्यांच्या बॅगांवर ठेवले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती.

धर्मांमध्ये तेढ नको

कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने धार्मिक व विषारी प्रचार जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटात चुकीचे दाखवण्यात आले आहे. याबद्दल मला माहीत नाही परंतु धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. असेही श्री. भुजबळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT