Anil Parab News : ठाकरे गटाचे नेते अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, दापोली रिसॉर्ट प्रकरणी 'ही' अपडेट

Dapoli Sai Resort Case : दापोली रिसॉर्ट प्रकरणात परब यांचीही ईडीने चौकशी केली आहे.
Anil Parab Latest News
Anil Parab Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मा्जी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी(दि.8) रत्नागिरीतील एका रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात परब यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात सदानंद कदम माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचा समावेश आहेत.

दापोलीतील साई रिसॉर्ट(Sai Resort)प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी( विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मंगळवारी या आरोपपत्राची विशेष न्यायालय दखल घेण्याची शक्यता आहे. आता ईडीने सोमवारी आरोपींवर २ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात २० साक्षीदारांचा समावेश आहे.या आरोपपत्रात परब यांचं नाव आहे की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.

Anil Parab Latest News
NIA Action On Terror Funding: 'एनआयए'ची टेरर फंडिंगविरोधात कारवाई; काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत छापेमारी

दापोली येथे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधकाम करण्यात आले. तसेच यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडी(ED)ने दावा केला आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केली आहे. तसेच तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनाही अटक केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यावर ईडीचा संशय आहे. अटकेच्या भीतीने अनिल परब(Anil Parab) यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात सागरी किनाऱ्यावर असलेल्या साई रिसॉर्टविरोधात पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयानं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवून जानेवारी महिन्यात १० कोटींच्या 'ईडी'ने साई रिसॉर्टवर जप्तीची कारवाई केली होती.

Anil Parab Latest News
Manipur Violence: शिंदे फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

दापोली रिसॉर्ट प्रकरणात परब यांचीही ईडीने चौकशी केली आहे. मार्च महिन्यात परब यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रद्दबातल करण्यासाठी याचिका दाखल केली असून सुनावणी होईपर्यंत आपल्याविरोधात कारवाई करण्यासाठी ईडीला रोखावे अशी विनंती याचिकेत केली आहे. न्यायालयाने परब यांना अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती मान्य करून सुनावणी जून महिन्यात ठेवली आहे.

Anil Parab Latest News
Vishwanath Mahadeshwar Death News : ठाकरे गटावर शोककळा;मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

काय आहे प्रकरण ?

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत जमिनीची किंमत 2.74 कोटी रुपये असून गुन्ह्यांतून मिळालेल्या पैशांतून या जमिनीवर 7.46 कोटी रुपयांचे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. कदम आणि परब या दोघांना ईडीने समन्स बजावले होते.

दापोली येथील साई रिसॉर्टविरोधात पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने तक्रार केली होती. त्यानंतर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवून जानेवारी महिन्यात १० कोटींच्या ईडीने साई रिसॉर्टवर जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर या भूखंडावर महसूल विभागाकडून बेकायदा परवानगी मिळवून तिथे बंगला बांधल्याचा आरोप आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com