Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan bhujbal News : नाशिकच्या उमेदवारीवरून छगन भुजबळांचे मोठं विधान; 'माझा निर्णय थेट दिल्लीतून'

Poltical News : महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांकडून या जागेवर दावा केल्याने जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

Sachin Waghmare

Congress News : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरून संभ्रम कायम आहे. या जागेवर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांकडून या जागेवर दावा केल्याने जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा संभ्रम वाढला आहे.

माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे. मलाही देवेंद्र फडणवीस यांनी आणि माझ्या नेत्यांनी अचानक हा निर्णय कळवला. मला या निर्णयाची कोणतीही कल्पना नव्हती. मला महायुतीची जबाबदारी दिली की मी पूर्ण करणार, असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ यांनी केलेल्या या दाव्याने नाशिकच्या जागेबाबतचा संभ्रम अजून वाढला आहे. (Chhagan bhujbal News )

मी मागेसुद्धा सांगितले होते, माझा तिकिटासाठी आग्रह नव्हता मागणी नव्हती. मात्र, दिल्लीत जी चर्चा झाली त्यात महाराष्ट्राबाबत चर्चा झाली तेव्हा माझे नाव पुढे आले आहे. याची कल्पना आम्हाला नव्हती. होळीसाठी निघालो होतो तेव्हा अर्ध्या वाट्यातून मुंबईला गेलो. वरिष्ठ पातळीवरून ठरलं आहे असे सांगितले गेले. मला एक दिवस द्या म्हटले. त्यानंतर मी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली विचारलं खरं आहे का ? त्यांनी सांगितले तुम्हाला उभं राहावे लागेल. आम्ही चाचपणी केली आहे. उभं राहायचे असेल तर आधी तयारी करतात. ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा झाली, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी आग्रह लावून धरला आहे. याबाबत महायुतीचा जो निर्णय होईल तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. जागा राष्ट्रवादीला सोडली तर घड्याळ चिन्ह राहील, असेही या वेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले.

'मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही'

गावागावांत बॅनरला लागले मला कळले आहे. गावबंदी वगैरे-वगैरे संबंधात निर्णय घेतला आहे. मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही. मी सदैव सपोर्ट केला आहे. मी फक्त एवढंच म्हणालो आहे, ओबीसीत नको वेगळं आरक्षण द्या. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाले आहे. त्याला मी पाठिंबा दर्शविला आहे. इतर आरक्षणात वाटा करू नका, ही माझी चूक असेल तर मी आरक्षणाला विरोध केला नाही, असेही भुजबळ म्हणाले.

...तर मराठा समाजाचे नुकसान होणार

पंकजा मुंडे गेल्या तर त्यांना अडवले. त्या तर काही बोलल्या नव्हत्या. भुजबळांना बोललं तर समजू शकतो, त्यांना अडविले ही चूक नाही का ? त्या वंजारी समाजाच्या आहेत त्यांना विरोध केला जात आहे का? प्रणिती शिंदे कधी बोलल्या का ? जरांगेवर कधी बोलल्या का ? गावात यायचं नाही का ? दलित वंजारी आणि माळी लोकांनी उभं राहायचे नाही का ते तरी सांगा, असे बोर्डस असतील आणि विरोध होत असेल तर मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. हाच विचार इतर समाज महाराष्ट्रात करेल. मराठा लोकांना पण अडचण होईल, असेही भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'विकासाचा विचार करा'

नाशिक आणि देशाचा विकास होईल. त्याचा फायदा सगळ्यांचा होतो. आपण एअरपोर्ट, बोट क्लब केला सगळ्या जातीचे लोक जातात गडावर ट्रॉली केली सगळ्या समाजाचे लोक जातात. सगळे आनंदाने राहतात. जो विकास केला त्याची कास धरू, देशाचा विकास कोण करतंय ते बघा ना ? पंतप्रधान मोदी यांच्यामुळे विकास होत आहे. त्यामुळे विकासाचा विचार करा, नाशिकचे जनता सूज्ञ आहेत, असे आवाहन त्यांनी केले.

'सांगतील तिथं मी काम करेल'

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ओबीसी नेते आहेत. माझ्याबद्दल म्हणाल तर मला जिथं काम करायला सांगतील तिथं मी काम करेल. मी यापूर्वी राम लीला मैदान भरवले आहे. दिल्लीत जबाबदारी दिली तर नक्की करू. काल परवा तर पवारसाहेब साताऱ्यात उभं राहणार आहेत, असं कळले. ते उभे राहणार असतील तर सुप्रियाताई आणि वहिनींना कळणार नाही. ते काय करतील कुणाला सांगता येणार नाही. कॉलर उडवली, ते एक वेगळं नेतृत्व आहे. त्यांनी प्रचार केला तर त्यांना फायदा होईल, असेही भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

R

SCROLL FOR NEXT