Vijay Shivtare On Ajit Pawar : अजित पवारांच्या विरोधात विजय शिवतारेंची सपशेल माघार; साडेपाच लाख मतांचं गणितही सांगितलं...

LoksabhaElection2024 : साडेपाच लाख मतं पवारविरोधी आहेत असे म्हणणाऱ्या शिवतारेंनी ही साडेपाच लाख मतं अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मागे का उभी राहणार याचे कारणदेखील दिले आहे
Vijay Shivtare | Ajit Pawar
Vijay Shivtare | Ajit PawarSarkarnama

Baramati Loksabha Constituency : आपण कोणाचं ऐकणार नाही, असे म्हणत अजित पवार यांच्या विरोधात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दंड थोपटले होते. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करत गाठीभेटीदेखील सुरू केल्या होत्या. अजित पवार यांच्यावर आक्रमक भाषेत शिवतारे यांनी टीका केली. बारामती मतदारसंघातील साडेपाच लाख मतं ही पवारविरोधी आहेत. त्यामुळे पवारांना विरोध करणाऱ्यांना दोन्ही पवार नको असे म्हणत अपक्ष लढण्यावर ठाम असलेल्या शिवतारेंनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर नरमाईची भूमिका घेतली. आज (शनिवारी) शिवतारेंनी अजित पवारांच्या विरोधात सपशेल माघार घेत असल्याचेच जाहीर केले.

Vijay Shivtare | Ajit Pawar
Ajit Pawar Vs Supriya Sule : "माहेरवाशिणीने किती दिवस माहेरी राहायचं, आता सासरी जायला पाहिजे"

साडेपाच लाख मतं पवारविरोधी आहेत, असे म्हणणाऱ्या शिवतारेंनी ही साडेपाच लाख मतं अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मागे का उभी राहणार याचे कारणदेखील दिले आहे. ''साडेपाच लाख मतं पवारविरोधी आहेत. मात्र, यातील एक पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. एक पवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे ही साडेपाच लाख मतं अजितदादांना मिळतील. आम्ही त्यांना समजावून सांगू. आमचे वरिष्ठ नेते त्यांना सांगितलच,'' अशी सरवासारव विजय शिवतारे यांनी केली.

बारामतीचा सातबारा अजित पवार यांच्या नावावर आहे का? असे म्हणणाऱ्या शिवतारेंनी माघारीनंतर बारामती लोकसभेचा सातबारा अजित पवारांच्या नावावर होणार, असे संकेत दिले आहेत. अजित पवारांच्या हातून काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय, असेदेखील शिवतारे म्हणाले.

R

'त्या' फोननंतर विचार बदलला

विजय शिवतारेंनी सांगितले की आपण अपक्ष लढण्यावर ठाम होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आला. आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होतो आहे. तसेच 10 ते 12 महायुतीचे खासदार देखील अडचणीत येत आहे. हे खतगावकरांनी सांगितले, असे विजय शिवतारेंनी सांगितले.

Vijay Shivtare | Ajit Pawar
Nilesh Lanke On Ajit Pawar : "...म्हणून अजितदादांची माफी मागितली," राजीनाम्यानंतर लंकेंची प्रतिक्रिया

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com