Chhatrabharti Students Organisation with Chhagan Bhujbal
Chhatrabharti Students Organisation with Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा

Sampat Devgire

नाशिक : शाळा-महाविद्यालयात (School) देवी-देवतांचे (God Photos) फोटो कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित करत छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे (Chhatrabharti Students Organisation) समाज सुधारणेसाठी आणि शिक्षणाचं जीवनमूल्य समाजात रुजविण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या अशा महापुरुषांचे फोटो शाळा-महाविद्यालयात असायला पाहिजे, या मागणीचा पुनर्उच्चार केला. (Chhatrabharti students organisation support Chhagan Bhujbal`s coment on Sarswati Photo)

यासंबंधीच्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला संघटनेतर्फे पाठिंबा देण्यात आला. श्री. भुजबळ यांची संघटनेतर्फे भेट घेत हा पाठिंबा देण्यात आला. छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष समाधान बागूल यांनी छात्रभारतीची मोहीम आणि कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता‘ या पुस्तकाच्या पाच लाख प्रती तरुणांपर्यंत पोचविण्याच्या मोहिमेची माहिती दिली.

समता परिषद शहराध्यक्षा प्रा. कविता कर्डक, प्रिया ठाकूर, देविदास हजारे, सागर निकम, राम सूर्यवंशी, स्वप्नील कुंभारकर, प्रशीक सोनवणे, सौरभ साळवे, कल्याणी अनिता मनोहर आणि पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेतर्फे श्री. भुजबळ यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले. तसेच छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंबंधीची मागणी करण्यात आली होती, असे स्पष्ट करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक चळवळीत आजही देशात अनेक लोक काम करत आहेत. ज्यांनी आपल्याला शिक्षण दिले असे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा समाजसेवकांनी बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी आपले बलिदान दिले. त्यांच्या प्रतिमा शाळा-महाविद्यालयात असायला पाहिजे. तसेच त्यांच्या विचारांची पिढी घडविण्याचे कार्य करण्याची मोठी गरज आजच्या परिस्थितीत आहे, असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT