Eknath Shinde, Ajit Pawar News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खराब हवामानाचा फटका; धुळ्याऐवजी जळगावात लॅंडिंग

Eknath Shinde, Ajit Pawar News : धुळे येथे आज (ता. १० जुलै) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कैलास शिंदे

Jalgaon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे येथे कार्यक्रमासाठी विमानाने जात असतांना धुळे येथे खराब हवामान असल्याने त्यांचे विमान अचानक जळगाव विमानतळावर उतरविण्यात आले, तेथून ते मोटारीने धुळ्याकडे रवाना झाले.

धुळे येथे आज (ता. १० जुलै) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईहून विमानाने धुळ्याकडे निघाले होते. मात्र, पाऊस व खराब हवानामुळे त्यांचे विमाना धुळे येथील विमानतळावर उतरणे अशक्य होते.

त्यामुळे त्यांचे विमान दुपारी अडीच वाजता जळगाव विमानातळावर उतरविण्यात आले. विमानातळाच्या प्रतिक्षालयात ते दहा ते पंधरा मिनीटे थांबले त्यानंतर मोटारीने ते धुळ्याला कार्यक्रमासाठी रवाना झाले. जळगाव येथेही पाऊस सुरू होता. या पावासात त्यांचा ताफा धुळ्याकडे रवाना झाला. त्यांच्या कार्यक्रमात झालेल्या अचानक बदलामुळे धुळ्यातील कार्यक्रम उशीरा सुरू झाला.

दरम्यान, या वेळी जळगाव (Jalgaon) विमानतळावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील आणि जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यावेळी जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीची माहीती घेतली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT