MLA Disqualification Decision: 'सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील; पण अंतिम निर्णय अध्यक्षांचा'

Shiv Sena News : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील दोन्ही गटांना नोटीसा पाठवल्या आहेत.
Narahari Jirwal, Rahul Narvekar News
Narahari Jirwal, Rahul Narvekar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena MLA Disqualification News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेतील दोन्ही गटांना नोटीसा पाठवल्या आहेत. अध्यक्षांनी नोटीसा पाठवल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झालेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ दिली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसीनंतर झिरवळ म्हणाले, सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील. मात्र, अंतिम निर्णय तो विधानसभा अध्यक्षांचा असेल, असे सूचक व्यक्त झिरवळ यांनी केले आहे. झिरवळ यांच्या वक्तव्याची एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Narahari Jirwal, Rahul Narvekar News
Uddhav Thackeray On BJP : भाजप राजकारणातील नामर्द; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील एकून ५३ आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. आमदारांना सात दिवसात आपले म्हणने मांडा असे नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत भाजपाशी (BJP) घरोबा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. याच दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे आमदार अपात्र होणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Narahari Jirwal, Rahul Narvekar News
NCP Crisis And Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर बारामतीतून कोण जिंकणार? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

त्यातच नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिंगे गटात अस्वस्थता आहे. त्यातच अपात्रतेच्या नोटीसा आमदारांना पाठवण्यात आल्यामुळे त्यामध्ये आणखी भरच पडली आहे. तर विदर्भ दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अधीन राहूनच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com