Punyashlok AhilyaDevi Jayanti sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CM Eknath Shinde : गेल्या वर्षी 'नामांतर', यंदा मुख्यमंत्री शिंदेंचा 'हा' धाडसी निर्णय

Pradeep Pendhare

Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला आहे. यापुढे सर्व सरकारी कागदपत्रांवर अहिल्याबाईंऐवजी 'अहिल्यादेवी' असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही यांनी दिली. तसेच राज्यभरातील सर्व सरकारी मुलींच्या वसतिगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल, अशी घोषणा केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचा कार्यक्रम चौंडी (ता. जामखेड) या त्यांच्या जन्मगावी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री संजय बनसोडे आदींसह ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार सुरेश धस, आमदार संजय शिरसाठ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार दत्ता भरणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, उज्वला हाके उपस्थित होते.

सरकार पालटून टाकले

मुख्यमंत्री शिंदे यांनी राम शिंदे (Ram Shinde) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवीनगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले आणि त्यानंतर नगरचे नाव बदलले गेले. आमच्या पोटात एक व ओठात दुसरे, असे काही नसते, आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो आणि ते पूर्ण करतो, असेही शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्यावर्षी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा करत अहिल्यादेवी नगर अशी केली होती. आता पुन्हा सर्व सरकारी कागदपत्रांवर अहिल्यादेवी, असा उल्लेख करण्याची ग्वाही दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर समाजासाठी महामंडळ

धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे. पुढील वर्षी अहिल्यादेवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

'युनिटी'च्या धर्तीवर अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा

आमदार राम शिंदे यांनी प्रास्ताविकात यावेळी चौंडी गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी मागणी केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर येथेच गुजरातमधील स्टेच्च्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवींचा पुतळा आणि स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारनं सहकार्य करावं. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यावर्षीपासून अहिल्यादेवी अध्यासन सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT