Sanjay Rathod and Chitra Wagh Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राठोडांचा विषय चित्राताईंची पाठ सोडेना...

Chitra Wagh : धर्मातंर करून राज्यात अल्पवयीन मुलींना फसविण्यात येत आहे.

कैलास शिंदे

जळगाव : महागाईमुळे महिलांचे किचन बजेट कोलमडले हे निश्‍चीत आहे, मात्र ‘कोरोना’मुळे जागतिक मंदींचे संकट होते,त्यामुळे देशातील अनेक देशातील अर्थव्यवस्था कोलमडली होती.श्रीलंकेत तर लोकांनी उठाव केला होता. अशाही स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी देशात धान्य योजना राबवून जनतेला दिलासा दिला होता, याच जागतिक मंदीमुळे महागाईची झळ बसली आहे, भारतातही त्यामुळेच महागाई आहे. मात्र येत्या काळात महागाई कमी करण्याकडे केंद्र व राज्य शासन लक्ष देईल, अशी ग्वाही वाघ यांनी दिली. त्या जळगाव येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी देखील त्यांना मंत्री संजय राठोड यांच्याबद्दल माध्यमप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली.

यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजप (BJP) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीप्ती चिरमाडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाव, बेटी पढाव चे संयोजनक डॉ.राजेंद्र फडके, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (Sanjay Rathod and

Chitra Wagh Latest News)

चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, जागतिक मंदीची झळ जगात सर्वानाच बसली आहे. आपल्या शेजारच्या देशाची अक्षरश: वाताहत झाली होती, तरीही आपल्याकडे पंतप्राधानांनी धान्य योजना राबविल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला,जागतिक मंदीमुळे आज महागाई आहे. मात्र, येत्या काळात केंद्रातील व राज्यातील सरकार महागाई कमी करण्याकडे लक्ष देईल,अशी ग्वाहीच त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे, त्यांनी गेल्या १२७ दिवसात त्यांनी राज्यात अनेक चागंले निर्णय घेतले आहे. त्यामुळे या सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे.राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरूध्द आपली लढाई सुरूच असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या विरूध्द आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रस्त्यावरची लढाई आता संपली असून न्यायालयीन लढाई सुरू आहे. आपल्याला यश मिळेल याची आपल्याला खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, कोणत्याही महिलेचा अपमान म्हणजे सर्व महिलांचा अपमान असे आपण मानतो, मात्र अलीकडे काही सिलेक्टेड महिलांबाबत वक्तव्य केल्यास तो महिलांचा अपमान म्हणून बोलले जाते हे चुकीचे आहे,असे आपण चालू देणार नाही,अगदी शेतातील मजूर महिलाचा अपमान झाला तरी तो महिलांचा अपमान आहे, त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान झाला असेल तर त्याचा आपण निषेध करतो, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याचबरोबर धर्मातंर करून राज्यात अल्पवयीन मुलींना फसविण्यात येत आहे.त्यांना फुस लावून पळवून नेण्यात येत आहे, जळगाव जिलह्यातील बोदवड येथेही असाच प्रकार घडला आहे, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रमाणे मुलींना संरक्षण देण्याचा कायदा केला आहे, त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी आपली मागणी असून त्याबाबत आपण प्रतयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT