Prajakta Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NCP News : मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले अन् जखमेवर मीठ चोळून गेले!

CM Eknath Shinde doesn`t gave any relief for drought affected Farmers-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काहीही केले नसल्याची टीका केली.

Sampat Devgire

Nashik NCP News : राज्यात यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतकरी धाय मोकलून रडत होता. तिथे जनतेचे कैवारी म्हणवून घेणारे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले, अन् मदतीची घोषणा करून गेले. मात्र, ज्यांच्यासाठी घोषणा केली, त्यांना काहीच मिळाले नाही, अशा सरकारला जनता अन् संकटग्रस्त शेतकरी धडा शिकवतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे निरीक्षक माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. (NCP leader Prajakta Tanpure criticized CM Eknath Shinde)

प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) (शरद पवार) (Sharad Pawar) निरीक्षक म्हणून नाशिकसाठी (Nashik) नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसह सरकारवर टीका केली.

कर्जमाफीची घोषणा होऊन सहा महिने उलटले, तरी अद्यापही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. स्वतःला गतिमान म्हणणारे सरकार प्रत्यक्षात गतिमंद आहे. सरकार फक्त घोषणांमध्ये गुंतले आहे. शेतकऱ्याला मदत वेळेवर मिळत नाही. ज्या कार्यक्रमांची गरज नाही, ते कार्यक्रम सरकार करीत असल्याची टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे आयोजित कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की नाशिक जिल्हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा आहे. त्यामुळे जे गेले, त्यांच्या मागे फक्त नेते गेले. सर्वसामान्य, कष्टकरी जागचा हललेला नाही. आता पक्षात नवीन व्यक्तीला काम करण्याची मोठी संधी आहे. घोषणाबाजीचे सरकार आहे. मोठ्या घोषणा केल्या; परंतु पैसे द्यायला सरकारला वेळ नाही. शेकडो कोटी रुपयांचा चुराडा होत आहे.

मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच नाही. ‘शासन आपल्या दारी’ आहे, तर घरात जाऊन लोकांना मदत द्या, हा फक्त स्टंटबाजीचा प्रकार आहे. निवडणूक आयोग मोदी, भाजपच्या हाताचे बाहुले असल्याची टीका तनपुरे यांनी केली. जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार नितीन भोसले, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे आदी या वेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT