Chhagan Bhujbal News : भांडण कसले? अजित पवार हे तर माझे भाऊ!

NCP leader Chhagan Bhujbal clears, Ajit Pawar is like my Brother-पवार- भुजबळ वादावर अखेर भुजबळांनी मौन सोडले. म्हणाले, दोन भावांमध्ये होते तशी झाली चर्चा.
Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Ajit Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal on & disputes with Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात ताल सुरात वाद रंगल्याच्या बातम्या आहेत. छगन भुजबळांच्या खुलाशाने त्याला दुजोरा मिळाला आहे. (There was a high voltage discusion in Ajit Pawar & Chhagan Bhujbal on OBC issue)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार नुकताच घडला. ओबीसी (OBC) आरक्षणाशी संबंधित विषयावर हा वाद होता.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Kirit Somaiya News : लग्नात आहेर म्हणून कोणाला सोन्याची बिस्किटे दिली ? सोमय्यांचा सवाल

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी होऊन वादाची ठिणगी पडली, अशा बातम्या माध्यमांत प्रसारित झाल्या होत्या. ओबीसी विषयावरील राजकारणाचा भाग म्हणून या बातम्या जाणीवपूर्वक पेरण्यात आल्या होत्या, अशीही चर्चा होती.

याबाबत नाशिक दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांना पत्रकारांनी छेडले. त्यामुळे अखेर भुजबळ यांनी याबाबत आपले मौन सोडले. यासंदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, अजित पवार यांच्याशी मी मोठ्या आवाजात बोललो. हा वाद अथवा संघर्ष नव्हता. आम्ही एकाच पक्षाचे आहोत. एका कुटूुंबातील आहोत. त्यामुळे दोन भावांमध्ये जशी चर्चा होते तशी चर्चा झाली. याबाबत माध्यमांनी मात्र पराचा कावळा करण्याचे कारण नसून, राईचा पर्वत केला जात आहे.

ते पुढे म्हणाले, की ओबीसी आरक्षणाबाबत बैठकीत गायकवाड आयोगाची आकडेवारी देण्यात आली. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अनुशेषाकडे मी लक्ष वेधले. त्यावर सचिवांनी काही माहिती नसल्याचे सांगितले. त्याबाबत अजित पवार यांनी अशी काही माहिती नाही, ती सत्य नाही, असे सांगितले.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Anand Paranjpe News : जाधवांना नाटकीय आंदोलनाची सवयच; परांजपेंची खोचक टीका

त्यावर तुमच्याकडे माहिती नाही, असे होऊ शकत नाही, असे मी सांगितले. त्यावर माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला. मात्र, आमच्यात मतभेद आहेत, असे काहीही नाही. तो विषय तिथेच संपला आहे.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Maratha Reservation News : ओबीसी नेत्यांचा दावा जरांगे पाटलांनी खोडून काढला; म्हणाले,"आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुटी नाही..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com