Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Nashik : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे धुव्वाधार भाषण; ठाकरेंना टोले, फडणीसांचं कौतुक

Eknath Shinde On Uddhav Thackeray : "आम्ही तिघे समजूतदार असून राज्याचा विकास वेगाने होणार"

सरकारनामा ब्यूरो

Shasan Aplya Dari In Nashik : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी होताच विरोधकांकडून टीका होत आहे. आम्ही मात्र समजूतदार आहोत. आता राज्यातील विकासकामे वेगाने होतील. विरोधकांत एकी राहिलेली नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलंक नसून खरे निष्कलंक आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. (Latest Political News)

नाशिक येथे शनिवारी (ता. १५) शासन आपल्या दारी उपक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारमध्ये समन्वय असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले. शिंदे म्हणाले, "अजित पवार आल्याने काही जणांना वाटते तीन जण एकत्र आलेत आहेत. आता सरकारचे कसे होणार? पण त्यांना सांगतो की आम्ही समजूतदार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. आता मी मुख्यमंत्री तर ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात. यातच अजित पवारही आमच्यासोबत आले आहेत. आता हे सरकार अधिक जोमाने काम करेन."

देवेंद्र फडणवीस हे निष्कलंक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांचे मन मोठे आहे. आता मला मुख्यमंत्री केले तर स्वतः उपमुख्यमंत्री झाले. आम्ही सोबती आहोत. त्यांचा अनुभव राज्याच्या विकासासाठी वापरत आहोत. त्यातच स्वतः उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांनी अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. हा त्यांचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आजच्या राजकारणातील, युतीतील कलंक नाही तर खरा निष्कलंक माणूस आहे."

फडणवीस यांना निष्कलंक म्हणतानी शिंदे यांनी कलंक शब्दावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "फडणवीसांवर कलंक लावण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस आजच्या राजकारणातील, युतीतील कलंक नाही तर निष्कलंक माणूस आहे. पण हे समजून घेण्यासाठी मनाचा तेवढा मोठेपणा असावा लागतो. कोतीवृत्ती, कद्रूपणा असलेल्या माणसांकडून ते शक्य नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT