Ajit Pawar : शिंदे गटाच्या आमदारांना अजितदादांनी दिला शब्द ; 'सर्वांना निधी मिळेल..'

Maharashtra Politics : पुन्हा याबाबत त्यांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेईन,"
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik : ज्या कारणासाठी शिवसेना (शिंदे गट) महाविकास आघाडीतून बाहेर पडला, तेच अर्थखातं अजित पवार यांना आताही मिळालं आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखात देऊ नये, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी केली होती.

अजित पवारांना अर्थखाते मिळाल्याने शिंदे गटाच्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व आरोपांवर आज (शनिवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शिंदे गटातील आमदारांना शब्द दिला. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Navale ON Milk Prices : आदेश नको, कायदा करा ; दूध दराबाबत सरकारच्या निर्णयावर किसान सभा संतप्त

"जो काम करतो तोच चुकतो. काम न करणारा चुकत नाही. तो बिनचूक राहणारच ना. मला तर पहाटे पाचवाजेपासून काम करण्याची सवय आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या माझ्याबाबत ज्या काही तक्रारी असेल त्याकडे मी लक्ष देईल. त्या तक्रारीत थोडेही सत्य असेल तर कोणतेही आढेवेढे न घेता मी चूक कबुल करेल. पुन्हा याबाबत त्यांची तक्रार येणार नाही, याची काळजी घेईन," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Dhananjay Munde Birthday Today : बळीराजा चिंतेत, संकटात, मग माझा वाढदिवस कशाला ? कृषीमंत्री मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाले..

"अर्थमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर मी अर्थ आणि इतर विभागांचाही आढावा घेतला आहे. आता मीच मंत्री असल्याने अर्थखात्यामुळे महायुतीत कटूता राहणार नाही, यासाठी प्रयत्न करणार आहे," असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

"आमदारांची नाराजी असेल ती दूर केली जाईल, कोणत्याही आमदाराला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाच्या आमदारांची व आमची बैठक होणार आहे. तेव्हा त्या सर्वांना विश्वासात घेतले जाईल," अशा शब्द अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिला.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com