Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

CM Eknath Shinde News : शेतकरीराजाला नैसर्गिक संकटापासून वाचव

Sampat Devgire

CM Eknath Shinde News : ‘महाराष्ट्रातील माझ्या शेतकरीराजाला वारंवार येणाऱ्या अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक संकटापासून वाचव, पुन्हा त्याच्यावर ही वेळ आणू नको’ अशी विनंती मी रविवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांकडे करून आज (सोमवारी) इकडे बागलाणच्या शेतकऱ्यांकडे धावत आलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, राज्यातील (Maharashtra) युतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे, (Farmers) तुमचे सरकार आहे. राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार असल्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेतोय. अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपुढे कोणाचेही काही चालत नाही. त्या तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.(Latest Political News)

बागलाण तालुक्यात तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानग्रस्त करंजाड, निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांची बांधावर भेट घेऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी दुपारी तातडीने तालुक्यात आले होते.

यावेळी मुरलीधर पवार, नरेंद्र पवार, शरद जाधव आदी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांची पाहणी करून बांधावरच शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, की शासन या नैसर्गिक तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिरस्थावर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला शासन जे जे देते, त्याला अजून काही जोड देता येईल का? याचा विचार आम्ही करीत आहोत. (Political Breaking News)

द्राक्ष, डाळिंब या नगदी पिकांना अवकाळी व गारपिटीपासून वाचवण्यासाठी अस्तरीकरण, आच्छादनाचे कवच देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. सध्याच्या या नैसर्गिक आपत्तीत एकूणच शासकीय यंत्रणेला अलर्ट केले आहे. सर्व पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यास नुकसानभरपाई देऊ. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.

पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशवराव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, नानाजी दळवी, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, अरुण सोनवणे, बिंदू शर्मा, आखतवाडेचे सरपंच अशोक खैरनार, नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.(Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT