धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive coment) केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या प्रतिमेस जोडे मारून, प्रतिमेचेही दहन करून निषेध केला. मंत्री सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही पक्षाने केली. (NCP agitaion against Agriculture minister Abdul Sattar)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषिमंत्री सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. याबद्दल मंत्री सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने येथे तीव्र निषेध केला. महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत व मंत्री सत्तार यांच्या प्रतिमेस जोडे मारून, प्रतिमादहन करून निषेध नोंदविला.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती व परंपरेला लाजिरवाणी गोष्ट आज राज्यात घडली. जबाबदार पदावर असताना कृषिमंत्री सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खासदार श्रीमती सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. ही अतिशय शरमेची बाब आहे. महाराष्ट्रासाठी व लोकशाहीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
मंत्री सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही पक्षातर्फे करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, नंदू येलमामे, गोरख शर्मा, यशवंत डोमाळे, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, सरोज कदम, राजू चौधरी, संजय माळी, राजेंद्र चौधरी, नगरसेवक कमलेश देवरे, राजेंद्र सोलंकी, महेंद्र बागूल, सुमीत पवार, जितू पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.
दरम्यान, तालुका काँग्रेस कमिटीनेही या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला. तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, पंचायत समिती सदस्य एन. डी. पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर आदी यावेळी उपस्थित होते
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.