Bharat Jodo Yatra News : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी पोहोचली आहे. या वेळी राहुल गांधी यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतली होती. देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
तेलंगणामध्ये एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हाती मशाली मशाली दिसल्या होत्या. काँग्रेसची आजची मशाल यात्रा ही भव्य अशीच होती. स्वत: राहुल गांधी यांनी हातात मशाल घेतली होती. त्यांच्यासोबत हजारो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हातात मशाली घेऊन चालत होते.
राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रणाणात गर्दी केली होती. बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत हजारो नागरिक यात्रेच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. ही यात्रा श्रीनगर येथे संपणार आहे. ही यात्रा एकूण तीन हजार ५०० किमीचा प्रवास करणार आहे. कन्याकुमारी, तामिळनाडू, कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही आता महाराष्ट्रात (Maharashtra) नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली आहे. काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत करण्यात आले.
नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.