sexual harassment case Jalgaon : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जवळपास 71 लाख लाभार्थींना केवायसी पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. ही केवायसी करताना लाभार्थी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. याचाच काहीजण फायदा घेत असल्याचे समोर येत आहे.
काही महिला लाभार्थींची आर्थिक शोषण करत आहेत, तर काहींनी थेट शरीरसुखाची मागणी करत असल्याचे प्रकार समोर येत आहे. जळगाव शहरात असाच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या (Women) फिर्यादीवरून गोकुळ चव्हाण याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ चव्हाण याने पीडितेच्या घरी जाऊन हा प्रकार केला. यानंतर पीडितेने गोकुळ चव्हाण करत असलेल्या प्रकाराची माहिती पतीला दिली, त्यानंतर सर्व घटनाक्रम समोर येऊन गु्न्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी की, पीडिता ही 25 जानेवारीला दुपारी तीन वाजता घरी एकटीच होती. त्याचवेळी पतीचे मित्र गोकुळ चव्हाण हा घरी आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (CM Majhi Ladki Bahin Scheme) केवायसीचं विचारलं. केवायसीचे कागदपत्र घेतल्यानंतर गोकुळ चव्हाण याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काम करून देतो, असे सांगून शरीर सुखाची मागणी केली.
मला तुम्ही खूप आवडता, तुम्ही माझ्याशी शरारिक संबंध ठेवा, हा विषय कोणालाही माहिती पडू देणार नाही. यानंतर लज्जास्पद वर्तन केलं. त्यावेळी पीडितेने गोकुळ चव्हाण याला चांगलेच सुनावले. तेव्हा तो घाबरून लगेच पलटला अन् त्याने, मी तुमची परीक्षा घेत होतो, अशी सावरासावर केली.
पीडितेच्या पतीला 27 जानेवारीला गोव्याला जायचे होते. हा प्रकार तिने पतीला सांगितला नाही. परंतु एक फेब्रुवारीला पीडितेचा पती गोव्यावरून परत आल्यानंतर, सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेचा पती अन् गोकुळ चव्हाण याच्यात चांगलाच वाद झाला. घराकडे न येण्याची समज दिली.
काही दिवस गेल्यानंतर, मार्च महिन्यापासून गोकुळ चव्हाण हा पुन्हा पीडितेच्या घराजवळ घिरट्या घालत राहिला. पीडितेशी नजरा-नजर करण्याचा प्रयत्न करत होता. पाठलाग करायचा. पीडितेच्या घरातील किचनसमोर येऊन थांबायचा. यानंतर दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाजता, पीडिता पतीसह नातेवाइकांबरोबर घरी असताना, गोकुळ चव्हाण हा घरासमोर येऊन थांबत, पीडितेशी नजरानजर करू लागला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
गोकुळ चव्हाण याने फेब्रुवारी महिन्यातच परिसरातील आणखी एका महिलेसोबत असाच प्रकार केला. संबंधित महिलेला बंद झालेली विधवा पेन्शन चालू करुन देतो, त्याबदल्यात प्रेमसंबंध ठेवा, हा प्रकार कोणालाही माहिती पडू देणार नाही, असे सांगून महिलेला त्रास दिला होता. या प्रकारानंतर पीडितेने पतीच्या मदतीने शेवटी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.