Balasaheb Thorat Congress Vs BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Congress Vs BJP : 'कर्जमाफीसाठी समिती नाही, नियत लागते'; थोरात म्हणाले, 'महामार्ग, बुलेट ट्रेनसाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी...'

Congress Balasaheb Thorat Slams BJP Mahayuti Government in Sangamner Over Denial of Farmer Loan Waiver : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरसकट कर्जमाफीची तातडीने घोषणा करण्याची मागणी केली.

Pradeep Pendhare

BJP Maharashtra government : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणींचा सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवत सरसकट कर्जमाफीची तातडीने घोषणा करण्याची मागणी केली.

शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

'सत्तेवर येण्यापूर्वी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन महायुती सरकारने दिले होते. आता, मात्र समित्या स्थापन करून वेळकाढूपणा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) सातबाऱ्यासाठी समिती नको', नियत लागते, असा थेट घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला.

शेतकऱ्यांची थट्टा

माजी मंत्री थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "महायुती सरकारकडे महामार्ग, बुलेट ट्रेन आणि मोठमोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध आहे; पण शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी असल्याचे कारण दिले जाते. हे वर्तन अन्यायकारक असून, शेतकऱ्यांची थट्टा करणारे आहे". पूर्वीही आंदोलने दडपण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या; पण त्या समित्यांचे काय झाले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आता, पुन्हा जर शेतकऱ्यांशी गद्दारी झाली, तर या सरकारची खैर नाही, असा इशाराही बाळासाहेब थोरात यांनी दिला.

महायुती सरकारची उदासीनता

थोरात यांनी राज्यातील शेतकऱ्यांची दैन्यावस्था अधोरेखित करताना सांगितले की, यंदाच्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, कापूस, फळबागा यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसाठी बँकांकडून कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडे धाव घ्यावी लागते. शेतीची भरवशाची हमी हरवली आहे आणि त्यात महायुती सरकारची उदासीनता शेतकऱ्यांच्या आत्मविश्‍वासावर घाला घालत आहे, अशी टीका देखील केली.

बच्चू कडू यांना सल्ला

माजी कृषिमंत्री असलेल्या थोरात यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि मानसिकतांची पूर्ण जाणीव असून, त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा संसद आणि सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनालाही त्यांनी समर्थन दिले असून, त्यांच्या तब्येतीसाठी काळजी घ्यावी आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. सरकारने आता आणखी विलंब न करता, शेतकऱ्यांचा उद्रेक होण्यापूर्वी सरसकट कर्जमाफीची तातडीने घोषणा करावी. हीच काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांशी फसवणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा देखील थोरात यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT