BJP & Congress Flags
BJP & Congress Flags Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Navapur APMC election news : नवापूरला काँग्रेस, भाजप आमने सामने

Sampat Devgire

Navapur APMC election news : नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे पॅनल आहे. त्यामुळे येथे काँग्रेस विरूद्ध भाजप अशी लढत आहे. (straight fight in Congress & BJP panel in Navapur APMC)

भाजपच्या (BJP) शेतकरी परिवर्तन पॅनलला कपबशी हे चिन्ह तर काँग्रेसच्या (Congress) शेतकरी विकास पॅनलला छत्री हे चिन्ह मिळाले आहे. यंदा भाजपने काँग्रेसला मोठे आव्हान ऊभे केले आहे. त्यामुळे निवडणूक (Election) रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

निवडणूक रिंगणातील उमेदवार असे, कृषी सहकारी पतसंस्था सर्वसाधारण गट - गंगाजी कोकणी, दिनकर गावित, धीरसिंग गावित, नवलसिंग गावित, बकाराम गावित. विनायक गावित, प्रेमलाल वसावे (छत्री), वासुदेव कोकणी, शिवदास कोकणी, दिनकर गावित, दिलीप गावित, रमेश गावित, संदीप गावित, विष्णू वसावे (कपबशी), नरेंद्र नगराळे (गॅस सिलिंडर).

कृषी सहकारी पतसंस्था महिला राखीव : सुमित्रा कोकणी, विलांती ठींगळे (कपबशी), कलीबाई गवळी, जयश्री नाईक (छत्री), अनिता गावित (कपाट). कृषी सहकारी पतसंस्था, अनुसूचित जमाती : अशोक गावित (छत्री), शिवाजी गावित (विमान), सोनू गावित (बस), हरिश्चंद्र पाडवी (कपबशी), अनिल वळवी (ऑटो रिक्षा).

कृषी सहकारी पतसंस्था, इतर मागास प्रवर्ग : अर्जुन कुंभार (कपबशी), आरिफ बलेसरिया (छत्री). ग्रामपंचायत, सर्वसाधारण : दिलीप गावित, मीनेश गावित (छत्री), अमिता वसावे, सुनील वसावे (कपबशी). ग्रामपंचायत, अनुसूचित जाती, जमाती : भानुदास गावित (जीपगाडी), भालचंद्र गावित (कपबशी), रमेश गावित (छत्री).

ग्रामपंचायत, आर्थिक दुर्बल घटक : वसंत गावित (छत्री), रमिला गावित (कपबशी), व्यापारी व अडते : राहुल अग्रवाल (शिट्टी), लखन अग्रवाल (कपबशी), गिरीश गावित (कपबशी) या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल महाले यांनी दिली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT