Harshavardhan-Sapkal-Devendra-Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ संतप्त, म्हणाले "योगेश कदम हा बेशरम नमुना अजून मंत्रिमंडळात कसा"

Congress Harshvardhan Sapkal Angry, State Home minister Yogesh Kadam shameless, CM Devendra Fadanvis should remove Yogesh Kadam-गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सराईत गुन्हेगार घायवळच्या भावाला बंदुकीचा परवाना दिल्याच्या कृतीचे मुख्यमंत्री समर्थन करतात का?

Sampat Devgire

Congress News: कुख्यात गुन्हेगार घायवळ त्याच्या भावाच्या बंदुकीच्या परवान्याचा वाद आणखी पेटला आहे. पोलीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री दोघांवरही आज गंभीर आरोप केले.

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. युती करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवला.

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार घायवळ याच्या भावाला बंदुकीचा परवाना देण्यात आला. विशेष म्हणजे ज्यावेळी तो पोलिसांच्या रडारवर होता तेव्हा हे घडले आहे. परवाना देण्याचे काम योगेश कदम गृहराज्यमंत्री असताना झाले.

यानिमित्ताने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे एकेक 'कदम' उघडे होते आहे. ते एकदम बेताल आणि बेजबाबदार राज्यमंत्री आहेत. त्यांनी केलेली कामे हे महाराष्ट्राच्या वैभवाला अशोभनीय आहेत. असे मंत्री राज्याच्या मंत्रीमंडळात राहतातच कसे? असा प्रश्न त्यांनी केला.

स्वारगेट प्रकरणातील वक्तव्याची देखील मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली. या गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने बार होता. त्यामुळे गृहराज्यमंत्री हा बेशरम आणि एक नमुना आहे. बंदुकीचा परवाना देण्यात त्याचा हात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला अद्याप मंत्रिमंडळात ठेवलेच कसे? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.

यावेळी सपकाळ यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, एक उत्कृष्ट रमीपटू या भागातील आहेत. कृषी मंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली. शेतकऱ्यांना भिकारी म्हटले. ढेकळाचे पंचनामे करायचे का? असा प्रश्न केला. हे मंत्री शेतकऱ्यांचीच अत्यंत क्रूर वागले आहेत.

नाशिक विभागात अतिवृष्टीच्या आधी देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. राज्य सरकारने पंचनामाचा खेळ खेळणे थांबवावे. शेतकऱ्यांना थेट मदत द्यावी, असे सपकाळ म्हणाले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT