महेश माळवे -
Shrirampur News : मिनी महापालिका म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाले.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीचा डंका तर महाविकास आघाडीची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र दिसून आले.राज्यात सत्ताबदल झाला.त्याचाही परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला.
श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील( Radhakrishana Vikhe Patil) यांच्या गटाने सर्वाधिक पाच ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला.तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने सर्वाधिक पाच ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) गटाने पाच ठिकाणी यश मिळवत भारत राष्ट्र समिती पक्षाचे खाते उघडले. चार ठिकाणी सत्तांतराच्या माध्यमातून आमदार लहू कानडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपला गड मजबूत केला, तर करण ससाणे गटाला तीन पंचायतींवर समाधान मानावे लागले.
श्रीरामपूर तालुक्यात 17 ग्रामपंचायतींची निवडणूक होती. पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आले.त्यानंतर उर्वरित 13 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक चुरशीची झाली.मंत्री विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची शाळा घेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार्ज केले होते.(Gram Panchyat Election)
तसेच बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब शिंदे यांना दत्तनगर, गणेश मुदगुले यांना शिरसगाव,तर इंद्रभान थोरात यांना उक्कलगावसाठी ताकद दिली होती. मात्र, शिरसगाव वगळता दोन्ही ठिकाणी खासदार डॉ.सुजय विखे यांनी लक्ष घालूनही पराभव पत्कारावा लागला.
शिरसगावातही तिरंगी लढतीमुळे मुरकुटे गटाला फटका बसून याचा फायदा विखे गटाला झाला. आमदार लहू कानडे व करण ससाणे यांच्यात दुरावा आहे. त्यामुळे कानडे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा नुसता चंग बांधला नाही तर कार्यकर्त्यांना ताकद दिली. तसेच स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचेही स्वातंत्र्या होतेच. याचा परिणाम माळवाडगाव, भोकर, नाऊर, कान्हेगाव येथील सरपंचपदी कानडेंना यश मिळाले.
अशोक कारखाना निवडणुकीदरम्यान ससाणे व मुरकुटे यांच्यात झालेली युती सध्या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. कारखान्यापाठोपाठ बाजार समितीत त्यांना यश मिळाले असले तरी मतदारांना ही युती भावलेली नाही. घटलेल्या मताधिक्यावरून हे अधोरेखित झाले. मात्र, यावरूनही ससाणे बोध घ्यायला तयार नसल्याने तालुक्यात काँग्रेसकडील ग्रामपंचायतींचा आकडा वाढलेला दिसत असला तरी कानडेंशी घेतलेला काडीमोड ससाणे गटाला अडचणीचा ठरत आहे.
माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांचे सहकारी आणि करण ससाणे यांच्यातील वयाचा फरक ससाणे गटाला खिंडार पाडत आहे. हेच हेरून कानडेंकडून ससाणे, मुरकुटे गटातील नाराजांना आपलेसे करत स्वतंत्र बांधणी केली जात आहे. मुरकुटे गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. त्या खालोखाल ससाणे, विखे व कानडे यांना जागा मिळाल्या.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.