Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यात पार पडलेल्या एकूण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाला पुरता धोबीपछाड देत आपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीची सत्ता आबाधित ठेवत तब्बल १२ ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करून या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) झेंडा रोवला आहे. तर कोल्हे गटाला फक्त तीन ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली असून एक ग्रामपंचायत औताडे गटाला तर एका ग्रामपंचायतीची सत्ता अपक्षांच्या हाती गेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोपरगाव तालुका म्हणून ही परस्थिती कोल्हे गटाची असली तरी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी, चितली, ब्राम्हणगावं अशा मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने वर्चस्व मिळवत समतोल साधला आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या दृष्टीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या करिष्म्याची जादू राहता तालुक्यातील निवडणुकी दिसून आली आहे. राहता तालुक्यांतील कोपरगाव मतदारसंघाला जोडलेल्या गावांपैकी तीन प्रमुख मोठी गावे कोल्हे गटाने एकतर्फी विजय खेचून आणून आपली एकहाती सत्ता आणून ताकद सिद्ध केली आहे.
माजी आमदार अशोकराव काळे व आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या १७ ग्रामपंचायती पैकी काळे गटाने आपले बुरुज शाबूत ठेवून मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. त्याचबरोबर कोल्हे गटाच्या ताब्यातील सात ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी मतदातसंघांत मोठा निधी आणत कामे केल्याने काळे गटाने बाजी मारल्याचे बोलले जातेय.
पोहेगाव ग्रामपंचायतीची सत्ता अतिशय थोडक्या मतांवरून आमदार काळेंच्या हातून गेल्याचे मतमोजणी नंतर पुढे आलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. याठिकाणी कोल्हे-औताडे युती असून देखील काळे गटाचे सरपंचपद अवघ्या ६७ मतांनी गेले आहे. याठिकाणी काळे गटाने कोल्हे-औताडे युतीला टक्कर देवून आपल्या मताधिक्यात वाढ करतांना मागील वेळी असलेली तीन सदस्य संख्या देखील दुप्पट केली असून हि संख्या आता सहा झाली आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या २१ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पाहता आज सरपंच संख्येने काळे गट पुढे दिसत असला तरी सदस्य संख्येत मात्र कोल्हे आणि काळे यांचे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य संख्या पाहता काळे-कोल्हे यांना समान कौल मिळाल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.