Ajaj Beig & Rashid Shaikh
Ajaj Beig & Rashid Shaikh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

Sampat Devgire

मालेगाव : महापालिकेत (Malegaon) माजी महापौर रशीद शेख, (Rashid Shaikh) ताहेरा शेख (Tahera Shaikh) यांची शिवसेना (Shivsena) युतीसह सत्ता होती. या सत्ता काळात त्यांनी विरोधकांची मुस्कटदाबी केली. शेख यांच्या पुढाकारातूनच घरपट्टी वाढ, घरपट्टी सर्वेक्षण व शंभर कोटीच्या विकासकामांचा ठराव झाला आहे. या ठरावावरील सूचक, अनुमोदक त्यांचेच समर्थक आहेत, त्याचे पुरावे सादर करीत खुद्द काँग्रेसनेच (Congress) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वस्त्रहरण केले. (Congress expose NCP leader Rashid Shaikh On Malegaon issues)

मालेगाव महापालिकेत प्रशासकीय राजवट येताच याचप्रश्‍नी माजी आमदार रशीद शेख यांच्याकडून करण्यात येणारी टिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक एजाज बेग यांनी पत्रकार परिषदेत केला.

श्री. बेग यांनी महापालिकेत झालेल्या ठरावांच्या नकला सादर केल्या. आरोप- प्रत्यारोप, विकासकामांसाठी किंवा राजकीय चढाईतून नसून वाटे- हिश्‍याची ही लढाई आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या शंभर कोटींच्या विकासकामांचा ठराव सत्तारुढ गटानेच तयार केला. माजी उपमहापौर निलेश आहेर या ठरावाचे सूचक असून, माजी महापौर रशीद शेख हे अनुमोदक आहेत. घरपट्टी सर्वेक्षणाचा ठरावही सत्तारुढ गटाच्या पुढाकारानेच झाला आहे.

विकास कामांच्या प्रश्‍नी राजकारण करण्याऐवजी सर्व संमतीने शहरातील विकासकामे करावीत. शहरवासिय व मतदारांना सर्व ज्ञात आहे. त्याऐवजी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. रस्ते, गटारींची वाट लागली आहे. स्वच्छतेअभावी रोगराई व विविध साथ रोग तोंड वर काढत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्याकडे लक्ष द्यावे. स्वच्छता ठेकेदाराला पाठीशी घालणे बंद करावे. मनपातील गैरव्यवहार माजी आमदार रशीद शेख यांच्या पाठबळानेच झाले आहेत.

या वेळी जमील क्रांती. डॉ. मंजूर अय्युबी, जैनू पठाण, मुख्तार अहमद, जावीद अन्सारी, अब्दुल गफ्फार शेख, निहाल अन्सारी, हाशिम अन्सारी, इम्रान राशीद आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील पूर्व भागातील मुशावरत चौक ते स्लॉटर हाऊस या नवापुरा भागातील रस्त्यासाठी आपण कॉंग्रेस प्रवेश केल्यानंतर राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयांचा विशेष निधी प्राप्त करुन घेतला. या निधीतून मुशावरत चौक ते स्लॉटर हाऊस या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण होणार आहे.

आपल्या घरा समोरचा व पूर्व भागातील मुख्य रस्ता अन्य व्यक्तीच्या पुढाकारातून साकारतोय, हे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना खटकते आहे. यातूनच त्यांनी तातडीने ५० लाख रुपये खर्चातून हॉटमिक्स याच मार्गावर हॉटमिक्स रस्त्याचे काम सुरु केले आहे. हा खर्च पाण्यात जाणार असून, निधी वाया घालविण्यासाठी ते सरसावले की काय अशी शंका येते, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एजाज बेग म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT