Harshwardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला ललकारलं; म्हणाले, 'महायुती सरकार औरंगजेबाच्या विचारांचं'

Congress Harshwardhan Sapkal Mahayuti government Ahilyanagar : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांमध्ये महायुती सरकारला औरंगजेबाच्या विचाराचं म्हणत टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics latest : राज्यातील समाजवादी पक्षाच्या आमदाराने औरंगजेबाच्या प्रशासनावर स्तुतीसुमने उधळण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारचे विचार औरंगजेबाचे असल्याचे म्हणत टीका केली.

'राज्यातील ट्रिपल सीट सरकार हे जुलमी सरकार असून, ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे', असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यादाच शुक्रवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हिवरेबाजार इथं पोपटराव पवार यांची भेट घेतली. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, माजी महापौर दीप चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसमधील (Congress) पदाधिकाऱ्यांची इथंही गटबाजी उफाळून आली.

सपकाळ म्हणाले, "केंद्र आणि राज्यातील महायुती (Mahayuti) सरकार हे संविधान विरोधी वागत आहेत. इंग्रजांसारखे तोडा-फोडा राजकारण करा. सामाजिक मूल्यांचा चुराडा करण्याचे काम हे सरकारने चालवले आहे. सामाजिक ध्रुवीकरणावर अधिक भर दिला जात आहे. द्वेष, भय, गुंडागर्दी असे वातावरण राज्यात आहे. काँग्रेसची विचारधार समाता, बंधुत्व या मूल्यांवर प्रस्थापित आहे".

'राज्यातील ट्रिपल सीट सरकार हे जुलमी सरकार आहे. ते औरंगजेबाच्या विचाराने चालते आहे. याविरोधात आपल्याला छत्रपतींच्या मावळ्यांसारखे लढावे लागणार आहे. यातूनच काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळेल, अन् ते मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही', असाही निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

गटबाजी कायम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रथम अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बीडच्या मस्साजोग इथं सद्भावना यात्रेला जाण्यापूर्वी ते आले. सपकाळ यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री, आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी स्वागतास अनुपस्थित होते. सपकाळ पुढे दौऱ्यासाठी गेल्यावर काही पदाधिकारी बैठकीस्थळी आल्यावर, निरोप उशिरा मिळाल्याचे सांगितले. दौरा पूर्वनियोजित नव्हता, तो ऐनवेळी तो ठरला, असे बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT