Balasaheb Thorat and Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thorat VS Vikhe Patil : 'योगदान नाही पण श्रेय घेतलं...' : बाळासाहेब थोरातांनी विखे-पाटलांना डिवचलं

Balasaheb Thorat VS Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर टीका...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना डिवचले आहे. 'ज्यांचे योगदान नाही, ते निळवंडे धरणाचे योगदान घेत आहेत,' असा टोला आमदार थोरात यांनी पालकमंत्री विखे-पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर कुरण-पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला येथील रस्त्याच्या कामाच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार थोरात यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.

"अनेक अचडणींवर मात करीत निळवंडे धरण पूर्ण केले. यामध्ये ज्यांचे योगदान नाही, ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा निधी मिळाला होता. महायुती सरकारने या कामांना स्थगिती दिली. या कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले," अशी टीका आमदार थोरातांनी केली. तसेच महायुतीच्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात महायुती सरकारचे सुरू असलेल्या जातीय आणि धर्माच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणावर आमदार थोरात यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. 'राज्यात सध्या जाती-धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल हा सामान्य माणसाला आवडलेला नाही. संपूर्ण राज्यातील जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे,' असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त केला.

'जनतेसह लोकशाहीसाठी कठीण काळ...'

'महाविकास आघाडी सरकारच्या काळात कालव्यांना मोठा निधी मिळून कालव्याची कामे पूर्ण केली. उद्घाटनाच्या वेळी ज्यांचे योगदान आहे, अशांपैकी कोणीही नव्हते. श्रेय घेण्यासाठी ही मंडळी धडपड करत आहे. मात्र, जनतेला खरे माहीत आहे. आता जनतेसह लोकशाहीसाठी कठीण काळ असला तरी तो जास्त नाही. आगामी काळात सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार आहे,' असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT