Dr. Shobha Bachhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Shobha Bachhav politics : जे भाजपला जमले नाही ते खासदार शोभा बच्छाव करणार? पहिल्याच बैठकीत केले मोठे धाडस

Congress Dr. Shobha Bachhav Meeting Dhule collector Abhinav Goel : धुळे शहरातील अतिक्रमणे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र अतिक्रमण काढण्यास राजकीय पक्षांचाच विरोध होतो.

Sampat Devgire

Dr Shobha Bachhav News : नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.6) जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत धुळे शहराचा सर्वात अडचणीचा अतिक्रमणाचा विषय डॉ. बच्छाव यांनी चर्चेला घेतला. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने प्राधान्यक्रमाने शहराच्या स्वच्छतेला आणि अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य द्यावे. याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी, अशी सूचना खासदार बच्छाव यांनी केली. त्यामुळे जे प्रश्न भाजपला सोडवता आले नाहीत. त्या प्रश्नांना हात घालत बच्छाव यांनी मोठे धाडस केल्याची चर्चा आहे.

खासदार डॉ. बच्छाव, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

गेली पाच वर्ष धुळे महापालिका आणि जिल्ह्याच्या बहुतांश सत्तास्थानी भारतीय जनता पक्ष BJP आहे. या पक्षाने विविध घोषणा करून सत्ता मिळवली. विशेषता अतिक्रमण निर्मूलनाला त्यांनी प्राधान्य दिले होते.त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती त्यांनीही अशीच आश्वासने दिली होती. सध्याचे आमदार फारुक शहा यांची देखील अतिक्रमण निर्मूलन करण्याची भूमिका आहे. मात्र प्रत्यक्षात त्यात काहीही सुधारणा होऊ शकली नाही. अशा स्थितीत डॉ बच्छाव यांनी पुन्हा एकदा तेच धाडस केले आहे.

शहरातील अतिक्रमणे हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. शहरातील नागरी वस्त्या आणि बाजारपेठेत अतिक्रमणामुळे शहर बकाल झाले आहे. मात्र अतिक्रमण काढण्यास राजकीय विरोध होतो.डॉ. बच्छाव यांना ज्यांनी मतदान केले त्यांची देखील अतिक्रमण काढल्यास मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यांना ते कितपत परवडेल हा गंभीर प्रश्न आहे.

आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील हा विषय किती गांभीर्याने घेईल हा वादाचा विषय आहे. त्यामुळे जे भारतीय जनता पक्षाला जमले नाही ते डॉ बच्छाव Dr. Shobha Bachhav करू शकतील का? असा असा सवाल विचारला जात आहे.

या बैठकीला महापालिका आयुक्त अमिता दराडे पाटील, आमदार कुणाल पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम समीर, प्रदेश सदस्य युवराज करनकाळ आदींसह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पाणीप्रश्न सोडवा

शहराला नियमित पाणीपुरवठा कसा होईल याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यास सध्या शहराला आठ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात, धुळे शहराला गेली 25 वर्ष पाण्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना रोज पाणी मिळेल यासाठी प्रभावी उपाय योजले पाहिजेत. महापालिकेने त्यासाठी तातडीने पावले टाकावीत. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना खासदार बच्छाव यांनी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT