Dr Shobha Bachhav Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Shobha Bachhav Politics : काँग्रेस खासदारानं सरकारला दिला कर्जमाफीचा पर्याय...

Congress MP Dr. Shobha Bachhav demands farmer loan waiver : खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी महायुती सरकारला कर्जमाफीच्या प्रश्नावर दिला इशारा.

Sampat Devgire

Dr. Shobha Bachhav News : शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सध्याच्या स्थितीत गंभीर प्रश्न आहे. यावर शेतकरी आणि शेतकऱ्यांची निष्ठा असलेल्या नेत्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र राज्य सरकार आपणच दिलेल्या आश्वासनावर मूग गिळून गप्प आहे.

राज्यभरात मंगळवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने नाशिक मध्ये काँग्रेसच्या खासदार डॉ बच्छाव यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा घडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या प्रश्नावर आश्वासन दिले होते. शेतकरी कर्जमाफी वर प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे ते म्हणाले. या आश्वासनात कोणताही कालबद्ध कार्यक्रम नसल्याने शेतकरी आणि जिल्हा बँका धास्तावलेल्या आहेत.

याबाबत खासदार डॉ. बच्छाव यांनी शेतकऱ्यांची (Farmer) कर्जमाफी हा तातडीचा आणि प्राधान्याचा विषय आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. तोपर्यंत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज स्वतः भरावे. त्यामुळे जिल्हा बँक तसेच शेतकरी दोन्ही घटकांना दिलासा मिळेल.

शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात लोटला जाईल. राज्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या कृषी विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत.

शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकार अनेक घोषणा करते. शेतकऱ्यांसाठी सरकार काम करते असा दावा केला जातो. लोकप्रतिनिधी आणि मंत्री हे देखील आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पटलावर शेतकऱ्यांचे पिक विमा पासून विविध प्रश्न चर्चेला आहेत. यामध्ये विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा प्रश्न लावून धरला आहे. त्याला राज्य सरकार प्रतिसाद देते की शब्दच्छल करून टोलवून लावते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT