Jayram Ramesh sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress News : भारत जोडो यात्रा भाजपच्या ध्रुवीकरणाला बूस्टर डोस... जयराम रमेश

Rahul Gandhi काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येत आहे. नंदूरबारमध्ये तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार असून, त्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातील नेते मंडळी उपस्थित आहेत.

Umesh Bambare-Patil

Congress News : काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना लायकीपेक्षा अधिक दिले. काहींना मुख्यमंत्री केले काहींना मंत्री केलं, मात्र तरीही वॉशिंग मशीनचा मॅग्नेटिक पूल आहे, तो खूप प्रभावी असल्यामुळे ते काँग्रेस सोडून गेले. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून फक्त वैचारिक आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होत असल्यामुळे याचा काँग्रेसला निश्चित फायदा होईल. भाजप आणि आरएसएस देशात ध्रुवीकरण करत आहे. दररोज भारतात ध्रुवीकरणांचे डोस दिले जात असून, या ध्रुवीकरणाच्या डोसला बूस्टर डोस ही काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आहे, असा टोला जयराम रमेश यांनी लागावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येत आहे. नंदूरबारमध्ये तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार असून, त्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातील नेते मंडळी उपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयराम रमेश म्हणाले, राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो या यात्रा ही राजकीय यात्रा नसून केवळ फक्त वैचारिक यात्रा आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होत असल्यामुळे याचा फायदा काँग्रेसला निश्चित होईल.

सध्या देशात भाजप आणि आरएसएसच्या वतीने ध्रुवीकरण करण्यात येत आहे. दररोज भारतात ध्रुवीकरणांचे डोस दिले जात आहेत. या ध्रुवीकरणाच्या डोसला बूस्टर डोस म्हणजे काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा होय. काँग्रेसमधून दिग्गज नेते सोडून जात आहेत, याविषयी विचारले असता जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांना वॉशिंग मशीनची गरज असल्यामुळे ते भाजपत जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप दोन चिन्हांवर आगामी लोकसभा निवडणूक लढत आहे. यामध्ये पहिले कमळ आणि दुसरे वॉशिंग मशीन आहे. त्यांच्या एका कोपऱ्यात ईडी आणि सीबीआयदेखील काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना लायकीपेक्षा अधिक दिले. काहींना मुख्यमंत्री केले, काहींना मंत्री केलं.

मात्र, तरीही वॉशिंग मशीनचा जो मॅग्नेटिक पूल आहे, तो खूप प्रभावी असल्यामुळे ते काँग्रेस सोडून गेलेत. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, हरियाणा सरकार प्रत्येक मुद्द्यावर निष्क्रीय राहिली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT