Nitin Gadkari : नितीन गडकरी अचानक खर्गे, जयराम रमेश यांच्यावर का चिडले?

Legal Notice to Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या अधिकृत X सोशल मीडियावर हँडलवर नितीन गडकरी यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या एडिटेड व्हिडीओमुळे गडकरींनी खर्गे, रमेश यांना पाठवली कायदेशीर नोटीस
Jayram Ramesh, Nitin Gadkari, Mallikarjun Kharge
Jayram Ramesh, Nitin Gadkari, Mallikarjun KhargeSarkarnama

Delhi Political News :

आपण बरं आणि आपलं काम बरं, ही वृत्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आहे. ते कुठल्याही वादात पडत नाहीत, जे आहे ते स्पष्टपणे बोलून मोकळे होतात. त्यातही त्यांचा फोकस कायम विकासकामांवर असतो. असं असतानाही नितीन गडकरी अचानक चर्चेत आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्ग यांना थेट कायेदशीर नोटीस पाठवली आहे. सोबत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनाही नोटीस पाठवून माफीची मागणी केली आहे. त्यामुळे नितीन गडकरी अचानक आक्रमक का झाले, असा प्रश्न विचारला जात आहे.

Jayram Ramesh, Nitin Gadkari, Mallikarjun Kharge
Lok Sabha Election 2024 : अक्षय, युवराज अन् कंगणा भाजपकडून निवडणूक लढणार? 'या' मतदारसंघातून मैदानात उतरू शकतात

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याला निमित्त ठरलं आहे ते त्यांच्या मुलाखतीचं. नितीन गडकरी यांची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीचा काही भाग काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल करण्यात आला. पण तो व्हायरल करताना त्यातील काही भाग चुकीच्या पद्धतीनं म्हणून एडिट करून ट्वीट करण्यात आला.

त्यामुळे गडकरी यांच्या वाक्याचा संदर्भ बदलला असून या प्रकारानं ते प्रचंड चिडले आहेत. म्हणूनच गडकरींनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि महासचिव जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना कायदेशीर नोटीस पाठवत माफी मागण्याची मागणी केली आहे. एवढंच नव्हे तर नितीन गडकरींनी त्यांची मूळ मुलाखत आणि काँग्रेसनं ट्विट केलेली मुलाखत त्यांच्या X या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

चुकीची माहिती पसरवण्याचा आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपने काँग्रेसवर (Congress) केलाय. 'काँग्रेस खोटारडेपणाची फॅक्टरी आहे. इथं जे उत्पादन निर्माण केलं जात त्यात खोटारडेपणाची भेसळ केली जाते. जसा हा अर्धवट व्हिडीओ', या शब्दांत महाराष्ट्र भाजपनं (BJP) काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक तास 42 मिनिटांच्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. पण यातील संदर्भ बाजूला ठेवून मुलाखत व्हायरल केल्यामुळे आपल्याच सरकारवर गडकरी टीका करत असल्याचं दिसतं. त्यामुळेच गडकरींनी काँग्रेस अध्यक्षांच्या माफीची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

(Edited by Avinash Chandane)

Jayram Ramesh, Nitin Gadkari, Mallikarjun Kharge
Loksabha Election News : धाकधूक वाढली; राज्यातील भाजपचे उमेदवार ठरविणार 'हे' सहाजण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com