Sujay Vikhe on Rahul Gandhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe on Rahul Gandhi : 'सही मागताच मागं सरकले, 20-10 वर्ष काय, आताही नाकारलं'; सुजय विखेंनी 'फुसका बाॅम्ब' म्हटलं

Sujay Vikhe Reacts to Rahul Gandhi Vote Rigging Allegations in Rahata, Ahilyanagar : काँग्रेस राहुल गांधी यांनी मत चोरीचा भाजप आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Maharashtra election controversy : काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्यावरून भाजप आणि निवडणूक आयोग चांगलेच अडचणीत सापडले आहे.

निवडणूक आयोगाने या मत चोरीच्या आरोपांच्या चौकशीसाठी राहुल गांधी यांच्याकडे प्रतिज्ञापत्र देत, सही करून मागितले आहे किंवा आरोप चुकीचे असल्याचे मान्य करत, माफी मागावी असं सुनावलं आहे. या सर्व वादावर देशभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

सुजय विखे पाटील राहाता दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मत चोरीच्या मुद्याला 'फुसका बाॅम्ब' म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी यांची नेतृत्व गेली 20 वर्षांपासून, 10 वर्षांपासून, तर आता देखील लोकांनी नाकारलं आहे, असा टोला लगावला.

सुजय विखे पाटील म्हणाले, "कोणत्याही आमदाराला निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मतदार (Voter) याद्या उपलब्ध असतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी मतदार याद्या पब्लिश केल्या जातात, त्यावर हरकती मागवल्या जातात, त्या हरकतींची छाननी झाल्यानंतरच मतदार याद्या अंतिम होते". राहुल गांधींना जेवढ्या भागामध्ये आक्षेप आहे, तिथल्या आमदारांनी आक्षेप का घेतला नाही? असा सवाल विखे पाटलांनी केला.

'निवडणूक आयोगाविरोधात वाद निर्माण करताना, तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात, तिथं निवडणूक आयोगाविरुद्ध भांडू शकता, निवडणूक आयोगाने जेव्हा प्रतिज्ञापत्र सही करून मागितल्यास तेव्हा ते मागे सरकले. ते सही करणार नाहीत. हा एक 'फुसका बॉम्ब' आहे. यांना लोकांनी नाकारलेला आहे', असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला.

'राहता विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 65 हजारांचं मताधिक्य आहे. 1 लाख 30 हजार मते मंत्री विखे पाटील यांना पडली आहेत. 65 हजारांची मताधिक्य आहे, त्यात बोगस किती आहे, आपण समजू 5 हजार मतदान बोगस आहे, ते वजा करा, राहतात 60 हजार. हे फक्त आरोप-प्रत्यारोप आहे. जनतेने काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले आहे. हे फक्त त्यांचे नैराश्य आहे', असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.  

मतचोरीच्या मुद्द्यावर रणनीती काय असणार आहे, यावर बोलताना, सुजय विखे पाटलांनी ही रणनीती दिल्लीत तयार होते. राहुल गांधी यांना देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही. मतदारांवर विश्वास नाही. भारतातील कोणत्याही आस्थापनावर त्यांचा विश्वास नसल्यामुळे, त्यांना इटलीवरून लोक आणावी लागतात का काय, असा प्रश्न मला पडतो, असा टोला लगावला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर बोलताना, त्यांना 20 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी लोक नाकारतच होते आणि आता देखील नाकारतच आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर काय बोलणार, असेही विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT