Newlywed suicide case : पुणे हादरलं! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Newlywed tragedy Pune : वैष्णवी हगवणे प्रकरणाची वेदना ताजी असतानाच, पुण्यात पुन्हा एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळामुळे आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Sneha Zendge
Sneha Zendge Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे प्रकरणाची वेदना ताजी असतानाच, पुण्यात पुन्हा एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळामुळे आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्नेहा झेंडगे (वय 25, मूळ गाव कर्देहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणीने सासरच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी 20 लाख रुपये आणण्याच्या दबावामुळे, घरात एकटे असताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना 9 ऑगस्ट 2025 रोजी घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्नेहाचा पती, सासरे, सासू, दिर, नणंद, नणंदेचा पती आणि सासऱ्यांचे साडू अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात स्नेहाचा पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दिर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी एकत्र येऊन स्नेहाला लग्नानंतर सातत्याने त्रास दिल्याचा गंभीर आरोप आहे.

Sneha Zendge
Shivsena Politics : शिवसेनेचा मनसेला मोठा दणका, शहराध्यक्ष फोडला; चार माजी नगरसेवकांनी बांधले 'शिवबंधन'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह मे 2024 मध्ये झाला होता. सुरुवातीचे काही दिवस स्नेहाचे वैवाहिक जीवन सुखी होते, पण लवकरच सासरकडून छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींनी कंपनी सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली आणि ती पूर्ण करण्यासाठी स्नेहावर सतत दबाव टाकला जात होता. यासाठी तिला केवळ मानसिक छळच नव्हे, तर शारीरिक मारहाण आणि अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली.

Sneha Zendge
NCP SP's Mandal Yatra : भाजप प्रवेशाची चर्चा असलेल्या बड्या नेत्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला दांडी; चर्चेला उधाण

तक्रार मागे घेण्यास लावली आणि मानसिक दबाव

स्नेहाने यापूर्वी एकदा पोलिसांत (Pune Police) तक्रार दाखल केली होती, परंतु सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला धमकावून ती तक्रार मागे घेण्यास भाग पाडले. यामुळे स्नेहाच्या मानसिक तणावात आणखी वाढ झाली. सततचा छळ, आर्थिक मागण्या आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर, 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना तिने गळफास घेऊन जीवन संपवले.

Sneha Zendge
BJP Vs Shivsena : प्रभाग रचनेत फिक्सिंग : भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेची तक्रार

या घटनेनंतर स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय 55, रा. कर्देहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम 498 अ, 306, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Sneha Zendge
MNC-Congress: मनसेच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीच्या चर्चांना काँग्रेस लावणार फुलस्टॉप? आतल्या गोटात काय चर्चा सुरु?

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेली ही दुसरी घटना पुन्हा एकदा समाजात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. लग्नानंतर आर्थिक मागण्या, हुंडा प्रथा आणि मानसिक छळ यामुळे महिलांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, हे वास्तव चिंताजनक आहे.

Sneha Zendge
Aditya Thackeray: "कबूतरं म्हणजे शिंदेंचे आमदार नाहीत...."; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com