Balasaheb Thorat 3 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat On MVA : 'मविआ'च्या अस्तित्वाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं भाकीत; आता 'अशी' असेल वाटचाल...

Congress ShivSenaUBT Party NCP SharadChandra Pawar Party Balasaheb Thorat Sangamner MVA : विधानसभा निवडणुकीत जबर धक्का बसल्यानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झालेत. महायुतीला मिळालेल्या बहुमतामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला असून, 'मविआ'ला तो बॅकफूटवर नेत आहे.

यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत. या सर्व मुद्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी 'मविआ'च्या राज्यातील वाटचालीबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "हा निकालच महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. लोक अस्वस्थ आहे. कुठोही विजयाचा जल्लोष झालेला नाही. लोकांमधील अस्वस्थतेतून नवीन जुळवा जुळव चांगली होईल. देशात इंडिया आघाडी आहे. राज्यात महाविकास आघाडी अजून अस्तित्वात आहे. विरोधी पक्षाला कामासाठी स्पेस वाढली आहे. स्कोप वाढलाय. आता कितीही काम केले, तरी थोडं आहे!खूप काम करायचे आहे".

"वरिष्ठ पातळीवर बरीच जुळवा-जुळव सुरू आहे. ती आगामी काळात जनतेसमोर, सर्वांसमोर येईलच. विरोधक म्हणून काँग्रेस (Congress) आणि सहकाऱ्यांची ताकद सत्ताधाऱ्यांपुढे कोठेच कमी पडणार नाही, असे चित्र महाविकास आघाडीचे असेल", असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

महायुतीसमोर 'मविआ'तील दिग्गजांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशामुळे महायुतीला धक्का बसला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीत जनतेत प्रचंड रोष असताना देखील अभूतपूर्व यश मिळाले. महायुतीच्या यशासमोर 'मविआ'चा धुव्वा उडाला. यात 'मविआ'च्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला समोर जावं लागलं. याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील समावेश आहे.

महायुती अन् 'मविआ'ची बलाबळ

विधानसभा 2024च्या निवडणुकीत महायुतीने 234 जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीला 50 तर अपक्ष चार जागांवर विजयी झाले आहेत. महायुतीमधील भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला 57, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41, जनसुराज्य शक्ती दोन, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी आणि राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रत्येकी एक जागांवर विजय झाला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला 20, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला दहा समाजवादी पार्टी दोन, शेतकरी आणि कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT