Pawar Family : पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी 'या' दोन नेत्यांचा अडथळा; आमदार मिटकरींचा रोख कोणाकडे?

NCP MLA Amol Mitkari NCP Sharad Chandra Pawar MLA Jitendra Awhad MLA Rohit Pawar : पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी जे नेते अडथळे ठरत आहे, त्यांचे नाव घेऊन आमदार अमोल मिटकरी यांनी कोणावर निशाणा साधला.
Pawar Family
Pawar FamilySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेत अजित पवार यांच्या मातुश्री आशाताई पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याचं साकडं घातलं. तशी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताच, त्याचे पडसाद राज्यात उमटले.

यावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना बोलले की, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि रोहित पवार, हे पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी अडथळा ठरतील. या दोघांनाही पवार कुटुंब एकत्र यावं, असे वाटत नाही, असेही आमदार मिटकरी यांनी म्हटले.

Pawar Family
Balasaheb Thorat On Mahayuti : महायुतीमधील ओढाताणीतून पालकमंत्री ठरेना; बाळासाहेब थोरातांनी राज्यातील गुंडगिरीचे 'वर्णन' एका शब्दात केले

अजितदादांच्या (Ajit Pawar) मातुश्री आशाताईंनी व्यक्त केलेल्या भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. परंतु शेवटी पवार कुटुंबातील लोक, ज्येष्ठ-वरिष्ठ लोक यावर एकत्र येऊन निर्णय घेतील, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Pawar Family
Constitution : संविधानाच्या हस्तलिखिताच्या मूळ प्रती किती? 'त्या' कशा जतन केल्या जातात?

अजितदादा महाराष्ट्राचं नेतृत्व करणार

दरम्यान, 2024 हा काळ अजितदादांसाठी आणि राष्ट्रवादीसाठी अतिशय संघर्षाचा काळ होता. पण 2024 मध्येच अजितदादांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. तसे ते करून दाखवलं. आता 2025 हे वर्ष राष्ट्रवादीसाठी महत्त्वाच असणारे आहे. आणि 2025 डिसेंबरपर्यंत अजितदादा महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व करतांना दिसतील, असा विश्वास आमदार मिटकरी यांनी व्यक्त केला.

आमदार धस यांच्या भूमिकेवर भाष्य...

आमदार मिटकरी यांनी बीडमधील घटनेवर आक्रमक असलेले भाजप आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, धस यांनी काय केले, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना समज मिळाली. यामुळेच त्यांनी प्राजक्त माळी प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली. आमदार धस यांनी राजकारण न करता पीडित कुटुंबियांना न्याय कसा देता देईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही मिटकरी यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com