Ahmednagar News : काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी विरोधकांच्या श्रेयवादी राजकारणावर टोलेबाजी केली. 'कामे आम्ही मंजूर करायची आणि उद्घाटन त्यांनी करायचे. म्हणजे वेड्याचा बाजार पेढ्याचा पाऊस', अशी गत विरोधकांची झाली आहे. श्रीरामपूर मतदारसंघात विकास कामांना गती देताना कधीही दुजाभाव केला नाही. सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. परंतु त्याला देखील कामातून उत्तर दिले, असेही आमदार कानडे यांनी म्हटले.
राहुरी तालुक्यातील 32 गावातील प्रवरा काठावरील आंबी इथल्या अंगणवाडी आणि शिवकन्या बचतगट कक्षाच्या उद्घाटनात ते बोलत होते. "दहा-वीस वर्षात जे कामे झाली नाही, ते रखडलेले रस्ते, वीज, पाणीप्रश्न सोडवून प्राथमिक सर्व शाळा डिजिटल करण्यावर भर दिला. सरकारी योजना पुढाऱ्यांच्या खिशातील पैशाच्या नाहीत. ती सामान्य जनतेच्या करामधून वसूल केलेल्या पैशाच्या आहे. विरोधकांना केंद्र आणि राज्याचा निधी कळत नाही. कामे आम्ही मंजुर करायची आणि उद्घाटन त्यांनी करायचे, हे मात्र चांगले कळते. म्हणजे वेड्याचा बाजार पेढ्याचा पाऊस", अशी टिका काँग्रेसचे (Congress) श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी विरोधकांवर केली.
आमदार लहू कानडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. राज्यातील भाजप (BJP) महायुतीचे सध्याचे सरकार फक्त घोषणाचे पाऊस पाडणारे सरकार आहे. विकास कामांचा ते हिशोब देऊ शकत नाही. कारण त्यांनी ती केलीच नाहीत. मात्र त्यांच्या कामाचा हिशोब मतदार राजा चुकता करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. गावाच्या विकासासाठी मला जनतेच्या आशीर्वादांची गरज आहे, असेही आमदार कानडे यांनी म्हटले.
"मी निवडणूक लढविणार आहे. कारण मी मागील पाच वर्षात विकास कामे केली, ती सर्व आपणास माहित आहे. त्या कामाचा हिशोब मतदार राजा निश्चितच चुकता करेल व विरोधकांना त्यांची जागा दाखवून देईल", असा विश्वास आमदार कानडे यांनी व्यक्त केला. शिवाजीराव कोळसे, वसंतराव कोळसे, अशोक कानडे, सरपंच संगीता साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, सतिष जाधव, सरपंच पुष्पावती साळुंके उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.