Nilesh Lanke : नीलेश लंकेंना 5 कोटी अन् दरमहा पाकिटाचं आमिष? ; आंदोलनामुळे मध्यस्थीसाठी अनेकांचे फोन!

Nilesh Lanke protest against Ahmednagar police continues : अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात खासदार नीलेश लंके यांचे दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला.
Nilesh Lanke protest
Nilesh Lanke protestSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : "मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. 5 कोटी रूपये देतो, महिन्यालाही पाकीट ठरवून देतो, अशी ऑफर दिली होती. जर हे लोक पाच कोटी रूपये देत असतील, तर हे पैसे कुठून आले? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पध्दतीने कारभार सुरू आहे", असा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नीलेश लंकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खासदार राऊत देखील लवकरच या आंदोलनात सहभागी होणार असून, आंदोलन स्थळी त्यांनी दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Nilesh Lanke protest
Nilesh Lanke : 'भ्रष्टाचाराचे मडके', खासदार लंकेंचे उपोषण; 'LCB'च्या कारभाराचे धिंडवडे

पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू आहे. या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. खासदार नीलेश लंके यांनी नागरिकांना पोलिसांविषयी असलेल्या तक्रारींवर आवाहन केलं आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी तक्रारदारांची संख्या वाढत आहे. आंदोलनातील मागण्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांशी शिष्टमंडळाने दोनदा चर्चा केली, मात्र ती निष्फळ ठरली.

खासदार नीलेश लंके(Nilesh Lanke ) म्हणाले, 'अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा कारभाराचा गंभीर विषय आहे. आपण तो हाती घेतला आहे. हा विषय शेवटला नेणारच, त्याशिवाय या खात्यातील भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही. समाजाचे रक्षकच भक्षक झालेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याला 10 ते 12 वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते.'

तसेच 'गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी 500 दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते. ज्या विभागातून निलंबित झाला त्याच विभागात सबंधित पोलिस निरीक्षक त्या कर्मचाऱ्याला त्या विभागात बोलवून घेतो. आर्थिक संबंधातून, अशा अनेक गोष्टी केल्या जातात. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत.', असे सांगून नीलेश लंके यांनी पोलिस दलाचे टेन्शन वाढवले आहे.

Nilesh Lanke protest
Mahayuti Political News : महायुतीत खटक्यावर खटके; भाजपच्या 'या' मंत्र्यांवर अजित पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

'याशिवाय 'अहमदनगर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर अवैध धंदे वाढले असून त्यातून हत्या घडण्याचे प्रमाण वाढले आहे. चंदन तस्करी, लोखंड, स्टील, रेशनिंग, गुटखा, कॅफे, वाळू, आयपीएल सट्टा, पेट्रोल डिझेलची तस्करी, जुगार क्लब, वेश्या व्यवसाय, बिंगो हे अवैध व्यवसाय कसे हाताळले जातात, याचीही आपल्याकडे सविस्तर माहिती आपल्याकडे आहे. बिंगो, आयपीएल सट्टा यामुळे अनेक युवकांनी आपले जीवन संपविले आहे. सुवर्णकार व्यवसायिकांना मोठया प्रमाणावर त्रास दिला जातो, याची पुराव्यानिशी माहिती आहे.' खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.

निलंबनाची मागणी -

अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखालीच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे चुकीच्या पद्धतीने काम चालते, असा गंभीर आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने काम करणारे अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले पाहिजेत.

तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. आंदोलनास किती दिवस लागतील हे माहिती नाही. ठोस निर्णय झाल्याशिवाय आता मी माघार घेत नसतो, असा इशारा नीलेश लंकेंनी दिला.

मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. नीलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यामुळे काहींची प्रकृती खालावत आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. आंदोलनकर्त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com