Shivaji Chumbhale & Devidas Pingle
Shivaji Chumbhale & Devidas Pingle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devidas Pingle News : शेवटच्या टप्प्यातही पिंगळे विरोधकांना धक्का!

Sampat Devgire

Nashik APMC election : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीतील माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या उमेदवारीला हरकत घेणारा अर्ज जिल्हा सहकार उपनिबंधकांनी फेटाळला. प्रतिस्पर्धी पॅनेलचे नेते शिवाजी चुंभळे आणि अनिल ढिकले यांचा पिंगळे यांना निवडणुकीपासून रोखण्याचा डाव शेवटच्या टप्प्यात फसला. त्यामुळे पिंगळे विरोधकांना हा धक्का मानला जातो. (District Cooperative registrar reject the Appeal against Pingle)

नाशिक (Nashik) बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या मार्गात सातत्याने कायदेशीर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. शिवसेनेचे (Shivsena) शिवाजी चुंभळे आणि अनिल ढिकले यांनी अगदी शेवटच्या टप्प्यात देखील त्यांच्या उमेदवारीविरोधातील फेटाळलेल्या हरकतीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले होते.

छाननीवेळी माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी शिवाजी चूंभळे व अनिल ढिकले यांनी हरकत नोंदविल्यानंतर या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल अपीलावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यामध्ये निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम ठेवत जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी अपील नामंजूर केले आहे.

नाशिक कृषी बाजार समिती निवडणूक प्रक्रियेत छाननीनंतरच्या तेराव्या दिवशी ग्रामपंचायत व सहकारी संस्था गटातून दोन उमेदवारांनी एकूण चार अर्ज मागे घेतले आहेत.

यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गट व आर्थिक दुर्बल गटातून सुनंदा नंदराम पेखळे यांनी, तर सहकारी संस्था सर्वसाधारण गट व सहकारी संस्था इतर मागास वर्ग गटातून ज्ञानेश्‍वर पांडुरंग पाळदे यांनी प्रत्येकी दोन अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकुण १६६ अर्ज शिल्लक असून, माघारीसाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी बाकी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT