Gulabrao Devkar News : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे ९९ टक्के जागावाटप एकमताने झाले आहे. आता त्याचा कोणतही वाद नाही. प्रचाराचा संयुक्तिकपणे एक टप्पा पूर्ण झाला आहे, अशी माहिती पॅनलप्रमुख तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी दिली. (Jalgaon APMC election campaign is begins of Mahavikas aghadi)
बाजार समितीच्या (Jalgaon) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Election) माघारीची अंतिम मुदत उद्या आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरले आहे.
तीन पक्षांमुळे जागा वाटपाची मोठी कसोटी होती. त्याबाबत पॅनलप्रमुख गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आमच्या आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाले आहे. एक ते दोन जागांबाबत चर्चा सुरू आहे. तो तिढाही सुटणार आहे. त्यामुळे आता जागा वाटपाबाबत आमचा कोणताही प्रश्न राहिलेला नाही. आम्ही मैदानात जोमाने उतरणार आहोत.
प्रचाराचा एक टप्पा पूर्ण
माघारीनंतर प्रचाराला गती मिळते. त्यामुळे आम्ही अगोदरच नियोजन करून प्रचार सुरू केला आहे, असे सांगून श्री. देवकर म्हणाले, की आमचे ७५ टक्के जागावाटप अगोदरच पूर्ण झाले होते. त्याबाबत एकमताने निर्णय झाला होता. त्यामुळे आम्ही त्या उमेदवारांच्या माध्यमातून भेटीगाठीस प्रारंभ केला होता. तो एक टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. आता उर्वरित जागावाटपही पूर्ण झाल्यानंतर नवीन उमेदवारांसह आम्ही आता दुसऱ्या टप्प्यातही गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.