नाशिक : जिल्हा नियोजन समितीची आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखालील बैठक ऑनलाईन होणार आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह जिल्हा नियोजन आधिकारी आणि अनेक वैद्यकीय आधिकारी पॉझीटीव्ह (Covid19) असल्याने ऑॅनलाईन बैठक होणार आहे. त्यामुळे असमान निधी वाटप, अखर्चिक निधी, भुजबळ कांदे (Suhas Kande) राजकीय वादातील तणाव नाहीसा झाला आहे.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजनाबाबत २०२१-२२ अंतर्गत डिसेंबर २०२१ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. २०२१-२२ अंतर्गत पुनर्वियोजन प्रस्ताव व २०२२-२३ अंतर्गत प्रारूप आराखडा यावर चर्चा होऊन २६ नोव्हेंबर २०२१ च्या नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचुन कायम करण्यावर चर्चा होईल.
४०० कोटी अखर्चिक
नियोजन विभागाला ४७० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील ४०० कोटींचा निधी पडून आहे. १० महिन्यात अवघे ७० कोटी रुपये विकास कामांवर खर्च झाले. त्यामुळे मार्च अखेरपर्यत म्हणजे अडीच महिन्यात ४०० कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान आहे. त्यात, जिल्ह्यातील सहा तालुक्यांत नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे.
कोरोना पडतो पथ्यावर
जिल्ह्यातील दोन्ही खासदार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हा नियोजन अधिकारी जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासह जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेचे चार वैद्यकीय अधिकारी पॉझिटीव्ह आहेत.
पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हा यंत्रणेतील ताफ्यातील काहींना कोरोनाची लक्षणे आहेत. एकुणच निमंत्रितांपैकी बहुतेक जण पॉझिटीव्ह असल्याने कोरोना निर्बंधाच्या आड अनेक वादाच्या विषयावर चर्चा टाळून विषय गुलदस्त्यात राहणार आहे. म्हणून जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रशासनाच्या पथ्यावर पडणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या योजनांवर चर्चा होत असली तरी, निधी वाटप हा तीन महिन्यांपासून वादाचा विषय झाला आहे. समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आधिकारावर आक्षेप घेत शिवसेनेने आमदार सुहास कांदे यांनी याविषयावर थेट न्यायालयात धाव घेतली आहे. निधीतील असमान वाटपावरुन मागील बैठकीत वादावादी झाली होती.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.