कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच, धर्मभास्करला लाजवेल असा ५० कोटींचा घोटाळा!

प्रशासनातील गोंधळाचा अतिशय गंभिर प्रकार उघकीस आला आहे.
Agreeculture department scham
Agreeculture department schamSarkarnama

नाशिक : हल्ली अगदी लहानशा कामाचेही गाजावाजा करून क्रेडीट घेण्याची स्पर्धा लागलेली असते. मात्र निविदा काढण्याचा सपाटा लावून ती कामे न करताच कृषी विभागाच्या (Agreeculture Department) अधिकाऱ्यांनी चक्क ५० कोटी रुपये गडप केले. कृषी मंत्री दादा भुसेंच्या (Dada Bhuse) जिल्ह्यातच हा धक्कादायक प्रकार घडला.

Agreeculture department scham
नगरसेवक म्हणतात, `लोक आमच्यावर कचरा टाकतील`

कृषी विभागातील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस येतात. जाऊ तिथे खाऊ ही या विभागातील अधिकाऱ्यांची मनोवृत्ती त्यातून वेळोवेळी उघड होऊनही यांची पैशांची हाव काही कमी होत नाही. धुळ्यातील गाजलेल्या धर्मभास्कर प्रकरणाही लाजवेल अशा मोडस आपरेंडीने काम करत पेठ तालुक्यातील सोळा कृषि अधिकाऱ्यांनी शासनालाच पन्नास कोटींचा चुना लावला आहे. कामांच्या निविदा काढूनही प्रत्यक्षात कुठलेही काम न करता कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून सुमारे पन्नास कोटीचा निधी हडप केला आहे. एका मजुराच्या तक्रारीनंतर वाचा फुटलेल्या या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ तालुका पोलिस ठाण्यात कृषी विभागातील या सोळा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Agreeculture department scham
तहसीलदारांच्या आपुलकीने `त्या` ज्येष्ठाने आत्महत्येचा विचार सोडला!

फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्यात आठ कृषी सहाय्यक, चार कृषी पर्यवेक्षकांसह तीन ते चार कृषी मंडळ आधिकाऱ्यांचा समावेश आहे. तक्रारदार योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे (३६, हेदपाडा, (एकदरा), ता.पेठ., जि. नाशिक) यांनी दिलेल्या न्यायालयीन तक्रारीवरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

ही आहे तक्रार

शासनाने आदिवासी उपयोजनेंतर्गत मृद सुंधारणाच्या कमार्टमेन्ट, नाला बंडिग, ढोळीचे बांध, दगडी बांध, मजगी, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, मातीचे बांध नूतनीकरण व जुनी भात शेती दुरुस्तीची २०११ ते २०१७ दरम्यान पेठ तालुक्यात गतिमान मजगी दगडी बांध आणि पाणलोट मजगी दगडी बांध योजनेंतर्गत कामांसाठी जाहिरात प्रसिध्द केली. यात बोरवठ, कोटंबी, उस्थळे, हनुमंतपाडा, बेहडमाळ, जामुनमाळ, एकदरे, हेदपाडा, उभीसोंड, मांगुणे, पातळी, गावंदपाडा, उंबरपाडा, जांबविहीर, आड बु., गोंदे, डोलारमाळ, भायगाव, करंजाळी, शिंगदरी, देवगांव या गावात योजना राबविणे प्रस्तावित होते. निविदा काढून मृद संधारणाची कामे ही यंत्राच्या साहाय्याने तसेच मजुरांमार्फत करणे अपेक्षित होते.

स्टॅम्प पेपर अन सह्या..

तक्रारदार योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे यांच्याकडे शेतीबरोबर उदर निर्वाहासाठी वडिलांचा ट्रॅक्टर ( एम.एच. १५ सी.व्ही ७३६१) आहे. त्याद्वारे वडिलांच्या नावे कंत्रांटी काम करतात. निविदेनुसार एका ट्रक्ट्रर चालकाला २५ लाखांच्या कामांसाठी जिल्हास्तरावर निविदा प्रसिध्द झाल्याने त्याने वडिलांच्या ट्रॅक्टरची नोंदणी करीत दोन हजार रूपये अनामतीसह निविदा भरली. कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषी विभाग पेठ येथे १०० रुपयांच्या स्टँम्पपेपर करून दिला होता. त्यावर शासनाचे हमीपत्र करून नोंदविण्यासाठी पेठच्या तालुका कृषी आधिकाऱ्यांनी कोऱ्या स्टॅम्पवर आणि ५० पावत्यांवर त्यांच्या सह्या घेतल्या.

१४७ शेतकऱ्यांचे जमीन सपाटीकरण

पाणलोट योजनेच्या कामात या स्टॅम्प पेपर व पावतींच्या आधारे संशयितांनी पेठ तालुक्यातील १० गावात ३ कोटी १४ लाख ०४ हजार ५०४ कामांना मंजूरी देऊन पेठ तालुक्यात ५० कोटी ७२ लाख ७२ हजार ६४ रुपयांची कामे पाच वर्षात ट्रँक्टर धारक व गावातील ३५ मजुरांनी मिळून केल्याचे दाखविले. त्यातील १४७ शेतक-यांच्या गटात जमीन सपाटीकरणासाठी ४ ट्रँक्टर वापरले गेले. ३५ मजुरांनी ६१० दगडी बांधकाम केले. असे पाच वर्ष काम केल्याचे दाखविल्याची तक्रार आहे. प्रत्यक्षात अशी कामे झालेलीच नाहीत, बिले मात्र निघाली आहेत.

२०११ ते २०१७ या कालावधीत मजूर व ट्रँक्टर ग्रुपधारक या सर्वांना मिळू २० हजार रुपयेच दिले जात. पण प्रत्यक्षात एक लाख साठ हजार रुपये मिळणे आवश्यक असताना त्यांच्या नावावरील पैसे संशयितांनी परस्पर काढले. पाणलोट मजगी दगडी बांध ही दुसरी योजना समांतर राबविली असे दाखवून त्यांची कामे ट्रँक्टर नोंदणीधारक व मजुरांकरवी करुन घेत पररस्पर मजुरांच्या को-या चेकवर सह्या घेत मजुरांचे नावे परस्पर पैसे काढले गेले.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कृषी सहाय्यक नरेश शांताराम पवार, दगडू धारू पाटील, संजय शामराव पाटील, विठ्ठल उत्तम रंधे, दीपक पिराजी कुसळकर, दिलीप ज्ञानदेव फुलपगार, प्रतिभा यादवराव माघाडे, राधा चिंतामण सहारे, दिलीप औदुंबर वाघचौरे, मुकुंद कारभारी चौधरी, किरण सीताराम कडलग, विश्वनाथ बाजीराव पाटील, अशोक नारायण घरटे, एम. बी. महाजन, सरदारसिंग उमेदसिंग राजपूत, शीलानाथ जगनाथ पवार.

---

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार ग्रामीण पोलिसांकडून माहीती घेण्याचे काम सुरु आहे. संशयितांनी सरकारी कामे न करता ती केल्याचे दाखवून हा गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले असून माहीती घेतली जात आहे.

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com