छगन भुजबळ, वळसे पाटील यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा विळखा

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना
Chhagan Bhujbal & Dilip walse patil
Chhagan Bhujbal & Dilip walse patilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध नेत्यांना सध्या कोरोनाने (Covid19)चांगवेच ग्रासले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse- patil) यांच्या घरी तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मुंबई कार्यालयातील बावीस कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शासनाने दक्षतेच्या सुचना दिल्या आहेत.

Chhagan Bhujbal & Dilip walse patil
छगन भुजबळांनी फटकारले, `काळजी घ्या, कारवाईची वेळ आणू नका`

गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रसार वाढल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यात शासनाने दक्षतेच्या सुचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयांतील न निवासस्थानी कार्यरत कर्मचारी, अधिकाऱ्यांचीही तपासणी होत आहे. या नियमीत तपासणीत आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी असलेले काही कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले.

Chhagan Bhujbal & Dilip walse patil
बनावट लसीकरण; गुन्हा दाखल करण्याची तयारी... पण?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील मंत्री कार्यालयातील बावीस कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज पॅाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने दक्षतेच्या सुचना दिल्या आहे. या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या क्रमचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र आज या बातमीने खळबळ उडाली असुन लोकांशी संपर्क येत असल्याने सर्व कर्मचारी अधिकारी खबरदारी घेत असताना ही स्थिती झाल्याने कोरोना प्रसाराबाबत धोक्याची घंटा मानली जाते.

केंद्रीय आरोग्यमंत्री बाधित

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार कोरोना बाधीत झाल्या आहे. गेले काही दिवस त्या सातत्याने विविध शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांत व्यस्त होत्या. त्यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती.

डॅा पवार गेले काही दिवस सातत्याने व्यस्त होत्या. संसदेचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत कार्यक्रमांना हजेरी लावली होती. विशेषतः कोविड विषयक आढावा घेण्याचे काम त्या सातत्याने करीत होत्या. या दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम झाले. त्यानंतर काल अस्वस्थ वाटल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आता त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com