Kisan sabha long March
Kisan sabha long March Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kisan Sabha Long March: मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत तोडगा नाही, लाँग मार्च मुंबईकडे...

Sampat Devgire

Nashik News: अखिल भारतीय किसान सभेचा लॉंग मार्च रविवारी दिंडोरीतून सुरू झाला. आज सकाळी तो नाशिकहून मुंबईकडे रवाना झाला. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासमवेत तीन तास झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे एकाच वेळी चर्चा व लाँग मार्च (Long March) दोन्ही सुरु राहणार आहे. (Trible & Farmers move towards mumbai for various deemands)

माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखालील हा मार्च काल सायंकाळी नाशिकला पोहोचला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त असलेल्या राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

माजी आमदार गावित, अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे आदी नेते या मार्चचे नेतृत्व करीत आहेत. हा मार्च नाशिकमध्येच थांबवावा असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी काल पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला. आज जिल्हाधिकारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोडगा न निघाल्याने आज सकाळी मार्चला सुरवात झाली.

शेतकरी, कर्मचारी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी लाँग मार्चची हाक दिली आहे. रविवारपासून लाँग मार्च सुरू झाला. आता हे 'लाल वादळ' विधानभवनावर धडकणार आहे. माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विधानसभेवर लाल वादळ घोंघावणार आहे. अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई अशा शेतकऱ्यांच्या पायी लाँग मार्चला सुरुवात झाली आहे.

दरम्यान या लॉंग मार्चच्या माध्यमातून विविध प्रश्नांबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. यामध्ये हक्काच्या वन जमिनीच्या लढाईसाठी नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सरकारी कर्मचारी, जुनी पेन्शन योजना, कोलमोडलेली आरोग्य सेवा, अंगणवाडी मानधन वाढ, पेन्शन योजना, आशा पोलीस पाटील मानधन वाढ, नुकसानभरपाई या प्रश्नासाठी विधानसभेवर लॉंग मार्च धडकणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास बैठक झाली. यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी शेतकरी आणि आदिवासींच्या विविध मागण्या मांडल्या.

याबाबत अजित नवले म्हणाले, पालकमंत्री भुसे यांच्यासमवेत झालेली बैठक किसान सभेने लाँग मार्च का काढला, आमच्या मागण्या काय हे समजून घेण्यासाठी होत्या. यासंदर्भात आम्ही अतिशय सविस्तरपणे मागण्या सादर केल्या आहे.

बहुतांश मागण्या धोरणात्मक तसेच राज्यस्तरीय असल्याने त्यांचा निकाल त्या त्या खात्याचे संबंधीत प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकारकक्षेत आहेत. महसूलमंत्री, दुग्धविकासमंत्री यांसह विविध मंत्र्यांना त्याबाबत अवगत करण्याची गरज आहे.

पालकमंत्र्यांनी दोन दिवस आंदोलन स्थगित करावे, पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी व संबंधीत विभागांशी बोलून निर्णय घेऊ असे आवाहन केले. मात्र किसान सभेच्या नेत्यांनी लाँग मार्च स्थगित करण्यास नकार दिला. एकीकडे शासनाशी चर्चा व लाँग मार्च दोन्ही सुरु राहील असे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT