Nashik Kumbh Mela 2027 preparation: नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि कुंभमेळ्याच्या कामांमुळे निर्माण झालेली कोंडी यावरून मोठे राजकारण सुरू आहे. यासंदर्भात नुकतेच शिवसेना नेते उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिकेवर टीका केली होती.
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून महापालिकेच्या महासभेत गोंधळ झाला. सध्या या रस्त्यांची कोंडी दूर करणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपवर चौफेर टीका होत आहे. आता राज्याचे शिक्षण मंत्री सादा भुसे यांनीही त्यात भर टाकली आहे.
नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर शहरातील खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था हे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. ही सर्व कामे यापूर्वीच व्हायला हवी होती, असे सांगत त्यांनी शहराच्या रस्त्यांच्या दुरावस्था झाल्याची कबुली दिली आहे.
मंत्री भुसे यांनी प्रशासनावरही ताशेरे ओढले आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. प्रशासनाने हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. त्या दृष्टीने कामे आणि नियोजन करावे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
रस्त्यांची कामे करताना संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या. विशेषता रस्त्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला. त्याबाबत काळजीपूर्वक कामे करणे अपेक्षित होते.
शहरातील रस्त्यांची कामे करताना एमजीएनएल गॅस कंपनी, महापालिका, पाणीपुरवठा विभाग आणि दूरध्वनी केबल यांच्यात कोणताही समन्वय पाहिजे होता. रस्ता खोदल्यास तो तातडीने पूर्ववत करणे अपेक्षित असते. वाहतूक वळविली असल्यास पोलिसांच्या मदतीनेच ती केली पाहिजे, असे सांगत महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या खापर फोडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.