Shirwal Accident: शिरवळ येथे भीषण अपघात; मावळातील तीन युवकांसह चौघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Shirwal accident four people killed: शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघातात मावळातील तीन युवकांसह चौघांचा मृत्यू झाला. दोघे जखमी असून उपचार सुरू आहेत.
Maval youth Shirwal accident
Maval youth Shirwal accidentSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : पुणे–सातारा महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मावळ तालुक्यातील तीन युवकांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्यानंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune Shirwal accident news: शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे १.१० वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने कार (एमएच १४ एलजे ३०३३) जात होती. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या डिव्हायडरला जोरात धडकली.

डिव्हायडरला धडकल्यानंतर कार पलटी झाली आणि महामार्गाच्या विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पडली. याचवेळी साताऱ्याच्या दिशेने विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकला (केए २७ सी ५८७८) कारची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

मावळातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत

या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (वय १९, रा. कामशेत), आदित्य बाळासाहेब गरुड (वय १९, रा. टाकवे) आणि निखिल बाळू राऊत (वय २०, रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला.

मृतांपैकी तीन युवक हे मावळ तालुक्यातील असल्याने या दुर्घटनेने तळेगाव दाभाडे, कामशेत आणि टाकवे परिसरावर शोककळा पसरली आहे. तरुण वयातील चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maval youth Shirwal accident
Teacher News: आश्रमशाळांमध्ये शिक्षक व्हायचंय? 2 हजार 421 जागा; उद्यापर्यंत प्राधान्यक्रम लॉक करा!

दोघे जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

या दुर्घटनेत दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बहुर, कामशेत) हे दोघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maval youth Shirwal accident
Harshvardhan Sapkal News: हर्षवर्धन सपकाळांचा RSS वर थेट हल्ला; ‘आदिवासी संस्कृती संघापेक्षा श्रेष्ठच'

महामार्ग पोलिसांकडून मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कार आणि आयशर ट्रक बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण का सुटले, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com