TET Exam Paper Leak; Maharashtra school education minister Dada Bhuse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse : TET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी घेरलं ; भर बैठकीत दादा भुसे म्हणाले, मी स्वतःहून राजीनामा देईल..

Dada Bhuse On TET paper leak : TET पेपरफुटी प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापलेलं आहे. शिक्षण मंत्री भुसेंच्या मतदारसंघ असलेल्या मालेगावात देखील गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra TET paper leak : सध्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. या प्रकरणात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानाबाहेर युवक काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलं होतं. तसेच त्यांच्या मतदारसंघ असलेल्या मालेगावात देखील गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे.

आता 'वंचित बहुजन आघाडी' व 'सम्यक' विद्यार्थ्यांनी मंत्री भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मालेगाव शासकीय विश्रामगृहात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 'वंचित बहुजन आघाडी' आणि 'सम्यक' विद्यार्थ्यांनी थेट मंत्री भुसे यांच्या समोरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी टीईटी पेपरफुटीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

पेपर फुटीवरुन आजवर राज्यातील कोणत्याही मंत्र्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही. जर तुम्ही TET पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तर हा संपूर्ण राज्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठरेल," अशी मागणी वंचित आघाडी व सम्यक विद्यार्थ्यांनी लावून धरली. त्यावर दादा भुसेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. दादा भुसे म्हणाले, "ज्यावेळेस राजीनामा द्यायचा असेल त्यावेळेस कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वतःहून राजीनामा देईल," असे मोठे वक्तव्य भुसेंनी केलं.

दरम्यान विद्यार्थी प्रतिनिधींनी मंत्री दादा भुसे यांना निवेदन देत आमच्या मागण्यांवर पुढील 8 दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम दिला. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास, संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दिला.

वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावातील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन केले होते. त्यावेळीही आंदोलकांनी भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आज शासकीय विश्रामगृहात विद्यार्थ्यांनी मंत्र्यासमोरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT